Gokul Dudh Sangh agrowon
ॲग्रो विशेष

Gokul Dudh Sangh : कोल्हापूर जिल्हा दूध संघाकडून ‘गोकुळ श्री’ स्पर्धा, पहिलं बक्षिस ३५ हजार

Gokul Shri Competition : पहिल्या क्रमांकासाठी म्हैस ३५ हजार, गाय २५ हजार, दुसऱ्या क्रमांकासाठी म्हैस ३० हजार, गाय २० हजार तर तिसऱ्या क्रमांकासाठी म्हैस २५ हजार, गाय १५ हजार असे बक्षीस असणार आहे.

sandeep Shirguppe

Kolhapur District Milk Gokul Dudh Sangh : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाकडून (गोकुळ) गायी व म्हशींसाठी ‘गोकुळ श्री’ स्पर्धा २० ते ३० नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी दूध उत्पादकांनी आपल्या संस्थेच्या लेटरहेडवर अध्यक्ष किंवा सचिव यांच्या सही शिक्क्यानिशी संघाचे बोरवडे, लिंगनूर, तावरेवाडी, गोगवे, शिरोळ व ताराबाई पार्क येथील कार्यालयात ९ नोव्हेंबरपूर्वी नोंदणी करावी, असे आवाहन गोकुळचे कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांनी केले.

गोडबोले म्हणाले, ‘स्पर्धेत सहभागी होण्यासाठी म्हैस कमीत कमी १२ लिटर प्रतिदिनी व गाय २० लिटर प्रतिदिनी दूध देणारी असणे आवश्यक आहे. विजेत्यांना म्हैस एक ते तीन क्रमांक व गाय एक ते तीन क्रमांक अशा सहा क्रमांकांना बक्षीस, चषक व प्रमाणपत्र देऊन ‘गोकुळ श्री’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

स्पर्धेबाबतची सविस्तर माहिती स्वतंत्र परिपत्रकाने प्राथमिक दूध संस्थांना कळविण्यात आली आहे. गोकुळ संघामार्फत आयोजित केलेल्या ‘गोकुळ श्री’ स्पर्धेत जास्तीत जास्त दूध उत्पादकांनी सहभाग घ्यावा असे सांगण्यात आले. यामध्ये पहिल्या क्रमांकासाठी म्हैस ३५ हजार, गाय २५ हजार, दुसऱ्या क्रमांकासाठी म्हैस ३० हजार, गाय २० हजार तर तिसऱ्या क्रमांकासाठी म्हैस २५ हजार, गाय १५ हजार असे बक्षीस असणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Disease : कांदा पिकावर करपा, पिळरोगाचा प्रादुर्भाव

Strawberry Cultivation : महाबळेश्वर तालुक्यात स्ट्रॉबेरी लागवड अंतिम टप्प्यात

Paddy Harvesting : सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३५ हजार हेक्टरवरील भातपीक कापणी पूर्ण

Water Storage : शिराळा तालुक्यातील ४७ पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरले

Winter Session of Parliament : संसदेचे हिवाळी अधिवेशन २५ नोव्हेंबरपासून

SCROLL FOR NEXT