Paddy Harvesting
Paddy HarvestingAgrowon

Paddy Harvesting : सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३५ हजार हेक्टरवरील भातपीक कापणी पूर्ण

Paddy Crop : जिल्ह्यातील ६२ हजार हेक्टरपैकी ३५ हजार हेक्टरवरील भातपीक कापणी पूर्ण झाली असून २७ हजार हेक्टरवरील भातपीक कापणी शिल्लक आहे.
Published on

Sindhudurg News : जिल्ह्यातील ६२ हजार हेक्टरपैकी ३५ हजार हेक्टरवरील भातपीक कापणी पूर्ण झाली असून २७ हजार हेक्टरवरील भातपीक कापणी शिल्लक आहे. दरम्यान गेले दोन दिवस पावसाने उघडीप दिल्यामुळे दिवाळी असून देखील गती प्राप्त झाली आहे. पावसाने उघडीप दिल्यास पुढील आठ ते दहा दिवसांत कापणी पूर्ण होण्याची शक्यता आहे.

लांबलेल्या पावसामुळे जिल्हयात यावर्षी शेतकऱ्यांना मोकळेपणाने भातपीक कापणी करता आलेली नाही. ऑक्टोबरच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यापासून भातपीक कापणीला साधारणपणे सुरवात होते. परंतु ऑक्टोंबर महिन्यात पावसाची संततधार राहीली.

Paddy Harvesting
Paddy Harvesting : खेडच्या पश्‍चिम भागात भात काढणीला वेग

१८ ऑक्टोंबरनतंर सकाळच्या सत्रात उघडीप मिळण्यास सुरवात झाल्यानंतर शेतकऱ्यांनी त्याच कालावधीत भातपीक कापणीस सुरवात केली. परंतु पावसाने शेतकऱ्यांची पाठ सोडली नाही.

Paddy Harvesting
Paddy Harvesting : सिंधुदुर्गात पावसाच्या सरी; भातपीक कापणीत व्यत्यय

तरीदेखील शेतकरी उघडीप मिळताच भातपीक कापणी करीत होते. सतत पडणाऱ्या पावसामुळे भातपीक जमिनीवर आडवे झाले आहे.त्यामुळे त्याची कापणी करताना देखील अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.

यावर्षी ६२ हजार हेक्टरवर भातपीक लागवड करण्यात आलेली आहे.त्यापैकी आतापर्यंत ३५ हजार हेक्टरवरील भातपीक कापणी पूर्ण झाली आहे. अजूनही २७ हजार हेक्टरवरील भातपीक कापणी शिल्लक आहे. गेले दोन दिवस पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे पुढील आठ ते दहा दिवस पावसाने उघडीप दिली तर जिल्ह्यातील भातपीक कापणी पूर्ण होईल, अशी शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com