Gokul Milk agrowon
ॲग्रो विशेष

Gokul Milk : गोकुळच्या दूध विक्रीचा नवा उच्चांक ! दिवसभरात २२ लाख ३१ हजार लिटर दूध विक्री

Gokul Dudh Sangh : मागच्या ८ दिवसांत झालेल्या सणामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील दूध संस्थांनी मोठी कमाई केली आहे.

sandeep Shirguppe

Kolhapur Milk Production : मागच्या ८ दिवसांत झालेल्या सणामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील दूध संस्थांनी मोठी कमाई केली आहे. गोकुळकडून रमजान ईद निमीत्त दूध विक्रीचा नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे.

यादिवशी २२ लाख ३१ हजार लिटर्स दुधाची विक्री झाली. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या आतापर्यंतच्या वाटचालीतील एका दिवसात झालेली हि सर्वाधिक दूध विक्री असल्याची माहिती चेअरमन अरूण डोंगळे यांनी दिली.

चेअरमन डोंगळे म्हणाले कि, रमजान ईद या दिवशी गोकुळच्या इतिहासातील एका दिवसाच्‍या दूध विक्रीचा नवीन उच्‍चांक प्रस्थापित झाला. रमजान ईद हा मुस्लिम धर्मियांचा पवित्र सण. या दिवशी दुधाला मोठ्या प्रमाणात मागणी असते. यावेळी २२ लाख ३१ हजार २८४ लिटर्स इतकी दूध विक्री एक दिवसात झाली असल्याची माहिती डोंगळे म्हणाले.

गेल्यावर्षी रमजान ईदला २० लाख ६३ हजार ६९२ लिटर्स दूध विक्री झाली होती. यंदा त्यामध्ये १ लाख ६७ हजार ५९२ लिटरची वाढ झाली. तसेच गुढीपाडव्यानिमित्य श्रीखंड व बासुंदी विक्री मध्ये उच्चांकी वाढ झाली.

याप्रसंगी संचालक बाळासो खाडे, बयाजी शेळके, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील, डेअरी महाव्यवस्थापक अनिल चौधरी, मार्केटिंग व्यवस्थापक हणमंत पाटील, सहा.महाव्यवस्थापक जगदीश पाटील, संगणक व्यवस्थापक अरविंद जोशी, पशुसंवर्धन व्‍यवस्‍थापक डॉ. प्रकाश साळोखे, संकलन व्‍यवस्‍थापक एस. व्ही. तुरंबेकर, उपेंद्र चव्हाण, लक्ष्मण धनवडे तसेच संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kalamna APMC : कळमना ‘एपीएमसी’ची एसआयटी चौकशी अवैध

Jalgaon Flood: जळगावमधील पाचोऱ्यात पावसामुळे पूरस्थिती; गिरीश महाजनांचे प्रशासनाला मदतीचे निर्देश

Maharashtra Heavy Rain : राज्यातील १३ जिल्ह्यांतील १६६ मंडळात अतिवृष्टी

E-Peek Pahani : खरिपातील ४ लाख ९२ हजार हेक्टर क्षेत्रावरील ई पीक पाहणी

Rain Crop Damage : अतिवृष्टीचा ९० हजार ४८३ हेक्टरवरील पिकांना फटका

SCROLL FOR NEXT