Gokul Milk Kolhapur : गोकुळच्या दूध उत्पादकांना ११ कोटी ३२ लाखांचे मिळणार अनुदान

Gokul Milk : गोकुळ सलंग्न दूध उत्पादकांच्या बँक खात्यावर लवकरच ११ कोटी ३२ लाख ४९ हजार ८३५ रुपये इतके अनुदान जमा होणार आहे.
Gokul Milk Kolhapur
Gokul Milk Kolhapuragrowon

Maharashtra Milk Subsidy : गोकुळ सलंग्न दूध उत्पादकांच्या बँक खात्यावर लवकरच ११ कोटी ३२ लाख ४९ हजार ८३५ रुपये इतके अनुदान जमा होणार आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात अनुदान मिळवणारा गोकुळ हा राज्यातील प्रथम क्रमांकाचा संघ असून, संघातील सर्वच कर्मचाऱ्यांनी झोकून देऊन संघाच्या आणि दूध उत्पादकांच्या उत्कर्षासाठी काम करावे, असे प्रतिपादन 'गोकुळ'चे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी केले.

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) संगणक विभागाचे व्यवस्थापक अरविंद नारायण जोशी यांनी शासनाच्या प्रतिलिटर ५ रुपये गाय दूध अनुदान योजनेचे काम चागंल्या पद्धतीने कमी वेळेत पूर्ण केलेबद्दल 'गोकुळ'तर्फे त्यांचा सत्कार संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांच्या हस्ते झाला. या वेळी ते बोलत होते. गोकुळ शिरगाव येथे कार्यक्रम झाला.

अध्यक्ष डोंगळे म्हणाले, "राज्य शासनाने गाय दूध खरेदीसाठी प्रतिलिटर ५ रुपये अनुदान योजना जाहीर केली, ही अनुदान योजना जाहीर केल्यानंतर त्यामध्ये घातलेल्या जाचक नियम व अटीमुळे अनेक शेतकरी या अनुदानापासून वंचित राहतील, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आजपर्यंत महाराष्ट्रातील अगदी मोजक्या दूध संघांना आणि त्यापैकी अगदी फार कमी दूध उत्पादकांना या अनुदान योजनेचा लाभ मिळालेला आहे.

अशा परिस्थितीत 'गोकुळ'ने या दूध अनुदान योजनेमध्ये चांगल्या पद्धतीने काम करून जवळपास ११ कोटी ३२ लाख इतके अनुदान दूध उत्पादकांना मिळेल, अशी माहिती शासनाकडे अपलोड केलेली आहे.

Gokul Milk Kolhapur
Milk Production : सूर्य तळपू लागला, दुभत्या जनावरांचे दूध उत्पादन घटण्याची भिती

यासाठी संघाच्या संगणक विभागाचे व्यवस्थापक अरविंद जोशी आणि त्यांच्या टीमने जास्तीत जास्त दूध उत्पादकांचा डाटा संघाकडे एकत्रित केला. हे कौतुकास्पद आहे.

यावेळी संचालक बाबासाहेब चौगले, अभिजित तायशेटे, अजित नरके, नविद मुश्रीफ, शशिकांत पाटील-चुयेकर, किसन चौगले, रणजितसिंह पाटील, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, सुजित मिणचेकर, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, अंबरिषसिंह घाटगे, बाळासो खाडे, चेतन नरके, युवराज पाटील, राजेंद्र मोरे, मुरलीधर जाधव, संचालिका अंजना रेडेकर, शौमिका महाडिक, योगेश गोडबोले उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com