Jayakwadi Dam Agrowon
ॲग्रो विशेष

Godavari River Basin : गोदावरी खोरे मोठे, मात्र तुटीचे खोरे

Jayakwadi Dam : गोदावरी खोरे हे सर्वांत मोठे खोरे असून तुटीचे खोरे आहे. समुद्रात वाहून जाणारे पाणी वळवून या खोऱ्यात आणण्यासाठी माझ्या वडिलांनी प्रयत्न केले.

Team Agrowon

Chh. Sambhajinagar News : गोदावरी खोरे हे सर्वांत मोठे खोरे असून तुटीचे खोरे आहे. समुद्रात वाहून जाणारे पाणी वळवून या खोऱ्यात आणण्यासाठी माझ्या वडिलांनी प्रयत्न केले. त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. आपण सगळे मिळून हे काम करू आणि गोदावरी खोरे सुजलाम् सुफलाम् करू प्रतिपादन राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

जायकवाडी धरणात पाण्याची पातळी वाढल्यामुळे गुरुवारी (ता. ३१) नदीपात्रात पाणी सोडण्यात आले. जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते जलपूजन करून विसर्ग सुरू करण्यात आला. नाथसागर जलाशय येथे या कार्यक्रमाचे आयोजन केले, त्या वेळी ते बोलत होते.

कार्यक्रमास आ. रमेश बोरनारे, आ. विलास भुमरे, आ. हिकमत उडान, आ. विठ्ठलराव लंघे, आ. विजयसिंह पंडित, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, उपविभागीय अधिकारी नीलम बाफना, जलसंपदा विभागाचे कार्यकारी संचालक संतोष तिरमनवार, अधीक्षक अभियंता प्रशांत संत, मुख्य अभियंता सुनंदा जगताप, मुख्य अभियंता अरुण नाईक, मुख्य अभियंता राजीव मुंदडा, अधीक्षक अभियंता समाधान सब्बीनवार,शाखा अभियंता मंगेश शेलार, तहसीलदार ज्योती पवार, मुख्याधिकारी पल्लवी अंभोरे आदी उपस्थित होते.

श्री. विखे पाटील म्हणाले, की स्व. शंकरराव चव्हाण यांच्या दूरदृष्टीतून जायकवाडी प्रकल्प साकारला. ६५ टी एम सी पाणी वळवून तुटीच्या गोदावरी खोऱ्यात आणता आले पाहिजे. महाराष्ट्र दुष्काळमुक्त झाला पाहिजे ही मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे. त्यांच्या भूमिकेला साथ देण्यासाठी सगळ्यांचे प्रयत्न आवश्यक आहेत.

यावेळी बालपणीच्या आठवणींनाही श्री विखे पाटील यांनी उजाळा दिला. प्रास्ताविक आ. विलास भुमरे यांनी केले. त्यांनी जल प्रकल्पाचे पाणी बंदिस्त पाइपलाइनद्वारे द्यावे. शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत रस्ते करावे, ब्रह्म गव्हाण उपसा जलसिंचन योजना, संत ज्ञानेश्‍वर उद्यानाच्या विकासासाठी निधी द्यावा, अशी मागणी मांडली. सूत्रसंचालन प्रवीण कन्नडकर यांनी केले.

मंत्री विखेंच्या घोषणा...

संत ज्ञानेश्‍वर उद्यान ‘पीपीपी मॉडेल’वर विकसित करणार. तेथे वॉटर स्पोर्ट, अत्याधुनिक संकल्पना विकसित करू. या प्रकल्पामुळे पर्यटन विकास होईल. याशिवाय १२ मेगावॉट हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट, फ्लोटिंग सोलर प्रकल्प असे विविध प्रकल्पना चालना देण्यात आली आहे.

तसेच ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेसाठी १५० कोटी दिले. एक वर्षात ही योजना पूर्ण करणार. जलाशयांचे गाळ काढून त्यांची क्षमता वाढविण्यात येईल, असेही श्री. विखे पाटील म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fertilizer Supply: जेवढी शेतीसाठी गरज, तेवढेच खत शेतकऱ्यांना मिळणार, कृषी विभागाचा निर्णय

Crop Insurance: शेतकऱ्यांना खरिपासाठी एकूण किती भरपाई आतापर्यंत मंजूर झाली?

Parbhani Kharif Planning: खरिपासाठी ७९ हजार ५२२ क्विंटल बियाण्याची मागणी

DJ Noise Incident: लग्नाच्या वरातीत डीजेचा दणदणाट, १४० कोंबड्यांचा मृत्यू, गुन्हा नोंद

Mango Loss 2026: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा, काजू नुकसानीचे पंचनामे सुरू

SCROLL FOR NEXT