sheep Goat Agrowon
ॲग्रो विशेष

Goat Sheep Subsidy : मिल्किंग मशिनसह शेळी-बोकड गट मिळणार अनुदानावर

Animal Husbandry : जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडून दरवर्षी ही योजना राबवली जाते. जिल्हा परिषदेच्या उपकर (सेस) योजनेतून आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या शेतमजूर व शेतकऱ्यांना ७५ टक्के अनुदानावर ४ शेळ्या व १ बोकड गट वाटप केले जाणार आहेत.

Team Agrowon

Solapur News : जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडून जिल्हा परिषदेच्या उपकर योजना (सेस) आणि जिल्हा वार्षिक योजनेमधून वैयक्तिक लाभाच्या विविध योजनेतून मिल्किंग मशिन, मुरघाससाठी सायलेज बॅग, शेळी-बोकड गट आदींचे अनुदानावर वाटप होणार आहे, इच्छुकांनी त्याचा लाभ घेण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे.

जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडून दरवर्षी ही योजना राबवली जाते. जिल्हा परिषदेच्या उपकर (सेस) योजनेतून आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या शेतमजूर व शेतकऱ्यांना ७५ टक्के अनुदानावर ४ शेळ्या व १ बोकड गट वाटप केले जाणार आहेत. तसेच ५० टक्के अनुदानावर पशुपालकांना मिल्किंग मशिन पुरविण्यासह ५० टक्के अनुदानावर मुरघास निर्मितीस प्रोत्साहन देणे अंतर्गत सायलेज बॅगवाटप करण्यात येणार आहे.

त्याशिवाय जिल्हा वार्षिक योजना दुभत्या जनावरांना खाद्य उपलब्धतेसाठी सुधारणा कार्यक्रम (वैरण व पशुखाद्य विकास कार्यक्रम) ५० टक्के अनुदानावर मुरघास निर्मितीस प्रोत्साहन देणे अंतर्गत सायलेज बॅग खरेदी करणे, खनिज मिश्रण वापरासाठी कमाल २ दुधाळ पशुधनासाठी ३३ टक्के अनुदान देणे, यासारख्या योजना राबवण्यात येत आहेत.

इच्छुकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम आणि पशुसंवर्धन अधिकारी डॉ. नवनाथ नरळे यांनी केले आहे.

२३ सप्टेंबरपासून अर्ज उपलब्ध

पशुसंवर्धन विभागाच्या या योजनांसाठी पात्र लाभार्थीकडुन अर्ज मागविण्यात येत असून, सदरचे अर्ज २३ सप्टेंबर २०२४ पासून पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती तसेच सर्व पशुवैद्यकीय दवाख्यान्यामध्ये उपलब्ध आहेत. तसेच जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर (www.zpsolapur) उपलब्ध आहेत. अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख २२ ऑक्टोबर २०२४ आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar MSP : केंद्राने साखरेची किमान विक्री किंमत ४३०० रुपये करावी

Paddy Harvesting : भुदरगडमध्ये भात कापणीला वेग

Tiger Terror : वाघाच्या दहशतीने शेतीकामेच रखडली

PM Surya Ghar Yojana : धुळे जिल्ह्यात नऊ हजार ग्राहक करताहेत छतावर वीजनिर्मिती

Maha DBT Scheme : यांत्रिकीकरणाच्या लाभार्थ्यांना मुदतवाढ देण्याची गरज

SCROLL FOR NEXT