Goats & Sheep Ear Tagging : शेळ्या-मेंढ्यांनाही ईअर टॅगिंग शासनाकडून अंमलबजावणी

Ear Tagging Goats : गाय-म्हशीच्या तुलनेत शेळ्या-मेंढ्यांचा प्रजनन कालावधी कमी असल्याने पशुसंवर्धन विभागावर या कामाचा अधिक भार पडणार आहे.
Goats & Sheep Ear Tagging
Goats & Sheep Ear Taggingagrowon
Published on
Updated on

National Digital Livestock Mission : शासनाने नॅशनल डिजिटल लाइव्हस्टॉक मिशन अंतर्गत भारत पशुधन प्रणाली कार्यान्वीत केली आहे. या अंतर्गत यापूर्वी गाय व म्हशींना ईअर टॅगिंग (बारा अंकी बारकोड) केले आहे. आता शेळ्या-मेंढ्यांनाही ईअर टॅगिंग केले जाणार आहे.

भारत पशुधन प्रणालीमध्ये पशुधनावर करण्यात येणाऱ्या उपचारासाठी देण्यात येणारी औषधे ई-प्रिस्क्रिपशनद्वारे देणे अभिप्रेत आहे. पशुधनाला वापरल्या जाणाऱ्या औषधावरून त्या भागात संभाव्य साथीच्या रोगाच्या शक्यतेचा अंदाज लावणे शक्य होणार आहे. त्यासाठी पशुधनाच्या कानात टॅगिंग करुन भारत पशुधन प्रणालीवर पशुधनाचे लसीकरण, प्रजनन, उपचार, खरेदी-विक्री आदी नोंदी घेतल्यामुळे वास्तवातील माहितीचा साठा होईल. त्याचा आधार घेऊन पशुपालकांना शासनाच्या सुविधा, योजनांसह पशुधनाला आवश्यक सेवांचा लाभ देणे शक्य होणार आहे.

यासाठी पशुसंवर्धन विभागाने ईअर टॅगिंगची मोहीम हाती घेतली. तीन वर्षांत गाय वर्ग व म्हैस वर्ग पशुधनाला ईअर टॅगिंग केले आहे. यातही प्राधान्याने गाय व म्हशींना ईअर टॅगिंग केले आहे. ही प्रक्रिया कायमस्वरुपी चालणार आहे.

Goats & Sheep Ear Tagging
Animal Ear Tagging : पशूचे ईअर टॅंगिंग नाही; मदत मिळणार नाही, काय आहे नवा नियम, १ जूनपासून कडक अंमलबजावणी

नव्याने जन्म घेणाऱ्या गाय, म्हैस वर्ग पशुधनाला टॅगिंग करत रहावे लागणार आहे. त्यासोबतच आता शेळ्या-मेंढ्यांनाही ईअर टॅगिंग केले जाणार आहे. यापूर्वी त्यांना टॅगिंग केले नव्हते.

पशुसंवर्धन'वरच भार गाय व म्हशींना ईअर टॅगिंग करताना पशुसंवर्धन विभागासोबतच खासगी दूध संघाचे मनुष्यबळ वापरण्यात आले होते. दूध अनुदानासाठीही त्यांच्याकडून टॅगिंगला मदत केली. पण, आता शेळ्या-मेंढ्यांचे टॅगिंग पशुसंवर्धन विभागाच्या कर्मचाऱ्यांनाच करावे लागणार आहे. शिवाय गाय-म्हशीच्या तुलनेत शेळ्या-मेंढ्यांचा प्रजनन कालावधी कमी असल्याने पशुसंवर्धन विभागावर या कामाचा अधिक भार पडणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com