MAFSU Agrowon
ॲग्रो विशेष

MAFSU Conference : ‘माफसू’मध्ये जागतिक पशुआहार शास्त्र परिषद

International Animal Nutrition Science Conference : नागपूर पशुवैद्य महाविद्यालयाच्या पशुआहार शास्त्र विभाग तसेच पशुआहार शास्त्र संघटना (बरेली) यांच्या संयुक्त सहकार्याने २० ते २२ जानेवारी दरम्यान जागतिक पशुआहार शास्त्र परिषद (व्हॅनकॉन) तसेच प्रदर्शनाचे करण्यात आले आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagpur News : नागपूर पशुवैद्य महाविद्यालयाच्या पशुआहार शास्त्र विभाग तसेच पशुआहार शास्त्र संघटना (बरेली) यांच्या संयुक्त सहकार्याने २० ते २२ जानेवारी दरम्यान जागतिक पशुआहार शास्त्र परिषद (व्हॅनकॉन) तसेच प्रदर्शनाचे करण्यात आले आहे.

नागपूर पशुवैद्यक महाविद्यालयात आयोजित ‘व्हॅनकॉन’ या परिषदेचे उद्‌घाटन सोमवारी (ता. २०) पशुसंवर्धन आणि पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे, भारतीय कृषी संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ. हिमांशू पाठक, ‘भाकृअप’च्या पशुविज्ञान शाखेचे उपमहासंचालक डॉ. राघवेंद्र भट्टा, पशुसंवर्धन विभागाचे सचिव डॉ. एन. रामस्वामी, नॅशनल ॲकॅडमी ऑफ व्हेटेरिनरी सायन्सेसचे अध्यक्ष डॉ. डी. व्ही. आर प्रकाश राव, कृषी शास्त्रज्ञ नियुक्ती मंडळाचे अध्यक्ष डॉ. संजय कुमार,

पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त डॉ. प्रवीणकुमार देवरे, कुलगुरू डॉ. नितीन पाटील, अधिष्ठाता पशुविज्ञान डॉ. शिरीष उपाध्ये, संचालक संशोधन डॉ. नितीन कुरकुरे, संचालक विस्तार शिक्षण डॉ. अनिल भिकाने, सहयोगी अधिष्ठाता डॉ. सोमकुंवर आणि परिषदेचे आयोजक सचिव डॉ. अतुल ढोक यांच्या उपस्थितीत होईल.

परिषदेमध्ये हवामान बदलाचा परिणाम, पशुपोषणात होणारे बदल, तसेच उपजीविकेचे साधन म्हणून पशुपालन या विषयांवर महत्त्वपूर्ण चर्चा होणार आहेत. यामध्ये देशभरातील नामांकीत संस्थांचे शास्त्रज्ञ, कृषी व पशुवैद्यक विद्यापीठांमधील प्रतिनिधी, तसेच भारतीय कृषी संशोधन संस्था मधील तज्ज्ञ आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञ असे ५०० हून अधिक शास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ,

उद्योग प्रतिनिधी, पशुवैद्यक, पशुपालक आणि पदव्युत्तर विद्यार्थी सहभागी होतील. अमेरिकेतून कॉर्नेल विद्यापीठाचे प्रा. जोसेफ मॅकफेडन, श्‍वान आहार तज्ज्ञ डॉ. अविनाश देशमुख, कुक्कुट आहार तज्ज्ञ डॉ. अजय भोयर, फ्रान्समधील उंट आहार शास्त्रज्ञ डॉ. बर्नार्ड फाये, कुक्कुटपालन तज्ज्ञ आणि सार्कचे प्रतिनिधी डॉ. युनुस अली आणि इथिओपियाचे कृषी महासंचालक डॉ. कदिये यांचा समावेश आहे.

परिषदेत विविध संशोधन आणि तांत्रिक विषयांचे सादरीकरण, महत्त्वाचे विषयांवर चर्चासत्र, शास्त्रज्ञ, उद्योग, शेतकरी संवाद सत्र, तसेच पशू पोषण प्रदर्शनीचा (फीड टेक एक्सपो) समावेश असेल. या तीनदिवसीय परिषदेच्या माध्यमातून पशू पोषण आणि पशू उत्पादन क्षेत्रातील विकासाला चालना देणारी अद्ययावत माहिती उपलब्ध होईल. शेतकऱ्यांसाठी आयोजित कार्यशाळेमध्ये त्यांना भेडसावणाऱ्या प्रश्‍नांबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

पशुपालकांनी व्हावे सहभागी

विदर्भातील शेतकरी, पशुपालक आणि पशुवैद्यकीय क्षेत्रातील अभ्यासकांनी या प्रदर्शनात व परिषदेत आवर्जून सहभाग घ्यावा. तसेच अधिक माहिती करिता दूरध्वनी क्रमांक ९८२३१७६३५२ वर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजक सचिव डॉ. अतुल ढोक यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Seafood Export: अमेरिकेच्या आयातशुल्क वाढीचा कोळंबी निर्यातीवर परिणाम, मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणेंची माहिती

FSSAI Registration: दूध उत्पादक-विक्रेत्यांना एफएसएसएआय नोंदणी सक्तीची

Unseasonal Rain: माकणी परिसरात पाऊस, गारपीट

Krishi Kumbh Exhibition: ‘कृषिकुंभ’कडे मंत्री, लोकप्रतिनिधींची पाठ

Unseasonal Rain Damage: ‘अवकाळी’ने रब्बी पिकांसह फळबागांना फटका

SCROLL FOR NEXT