Sugarcane agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane : उसाचा ठरलेला दुसरा हफ्ता न दिल्यास साखर कारखान्यांसमोर आंदोलनाचा इशारा

Sugar Factories : साखर आयुक्तालय आणि कारखान्यांसमोर आंदोलन करू, असा इशारा आंदोलन अंकुश संघटनेच्यावतीने निवेदनाद्वारे दिला होता.

sandeep Shirguppe

Kolhapur Sugarcane Issue : साखर कारखान्यांच्या मागील हंगामातील दुसऱ्या हप्त्याचे प्रस्ताव मंजूर करून कारखान्यांना पाठवावे. अन्यथा, साखर आयुक्तालय आणि कारखान्यांसमोर आंदोलन करू, असा इशारा आंदोलन अंकुश संघटनेच्यावतीने निवेदनाद्वारे दिला होता. यावर सात कारखान्यांचे प्रस्ताव आलेले आहेत. त्या प्रस्तावांवर शासनाचा अभिप्राय मागविला आहे. तो आल्यानंतर तत्काळ पैसे देण्याचे आदेश देऊ, असे आश्वासन साखर आयुक्त अनिल कवडे यांनी 'आंदोलन अंकुश'च्या शिष्टमंडळाला दिले.

हंगाम सुरू झाल्यानंतर दोन महिन्यांत दुसरा हप्ता देण्याचे साखर कारखान्यांनी कबूल केले होते. मागील गळीत हंगामात गेलेल्या उसाला ज्या कारखान्यांनी तीन हजार रुपयांपेक्षा कमी दर दिलेला आहे, अशा कारखान्यांचे १०० रुपये व तीनशे रुपयांपेक्षा जास्त दर दिलेल्या कारखान्याने ५० रुपये अतिरिक्त फायद्यातील दुसरा हप्ता साखर आयुक्तांची मंजुरी नसल्याने दिलेला नाही. दोन महिन्यांत दुसरा हप्ता देण्याचे कारखान्यांनी मान्य करून तशी संमतीपत्रे जिल्हाधिकाऱ्यांना दिली होती.

सध्या दोन महिने संपूनही साखर कारखान्यांकडून मागील हंगामाचा दुसरा हप्ता देण्यास टाळाटाळ होत आहे. सध्या सुरू असलेला गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आलेला आहे. त्यामुळे तत्काल कारखान्यांचे प्रस्ताव मंजूर करून शंभर रुपयांचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे केली.

यावेळी साखर आयुक्त अनिल कवडे यांनी सांगितले की, साखर आयुक्तालयाने शासनाचा अभिप्राय मागितला आहे. जिल्ह्यातील सात साखर कारखान्यांनी ऑडिटर तपासणी करून आणि साखर संचालक (कोल्हापूर) यांनी सर्व प्रस्ताव साखर आयुक्तांना पाठवले होते.

जानेवारी २०२४ च्या परिपत्रकानुसार एफआरपीच्या वर ऊसदर द्यायचा झाल्यास साखर आयुक्तांना परवानगी देण्याचे अधिकार आहेत. पण, त्या त्या हंगामातील दराबद्दलचे हे अधिकार आहेत. आर्थिक वर्ष संपून गेलेल्या हंगामाचे काय करायचे?

याबाबतचा अभिप्राय १५ मार्चला साखर आयुक्तांनी राज्य शासनाकडे मागितला आहे. या प्रस्तावावर शासनाचा अभिप्राय आला की, तत्काळ पैसे देण्याचे आदेश होतील.' शिष्टमंडळात धनाजी चुडमुंगे यांच्यासह दीपक पाटील, संभाजी शिंदे, श्रीकांत गावडे, महेश जाधव, दत्तात्रय जगदाळे, एकनाथ माने यांचा समावेश होता.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Unseasonal Rain Damage: राज्याला गारपीट, अवकाळीचा तडाखा, गहू, हरभरा, ज्वारी पिकांचे नुकसान, शेतकरी चिंतेत

Chhatrapati Sambhajinagar ZP Budget: छत्रपती संभाजीनगर ‘झेडपी’चा ७.४३ कोटी शिलकीच्या अर्थसंकल्प

Chhatrapati Sambhajinagar Politics: भाजपने मित्र म्हणत केसाने गळा कापला

Agri Success Story: कुटुंबाने उभारली यशाची गुढी

Pune Fruit Market: उन्हाळी हंगामात फळे तेजीत

SCROLL FOR NEXT