Agriculture Fertilizers Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Fertilizers : पिकांना द्या संतुलित खतमात्रा

Manage of Fertilizers in Crops : योग्य जमिनीत,योग्य वेळी, योग्य अंतरावर पेरणी करण्याबरोबरच खत व्यवस्थापनास पीक उत्पादनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्व आहे. पिकाच्या वाढीसाठी योग्य वेळी,योग्य प्रमाणात,योग्य खतांची मात्रा देणे आवश्यक आहे.

डॉ.आदिनाथ ताकटे

डॉ.आदिनाथ ताकटे

Fertilizers Management : पेरणीयोग्य पाऊस झाल्यास, जमिनीत वाफसा येताच खरीप पिकांच्या पेरण्या कराव्यात.पेरणी करताना कृषी विद्यापीठाने शिफारशीत केलेल्या जातींची योग्य अंतरावर लागवड करावी. याचबरोबरीने योग्य वेळी,योग्य प्रमाणात खत मात्रा द्यावी. स्थानिक परिस्थितीचा अंदाज घेऊनच पेरणीचे नियोजन करावे.

कापूस

काळी,मध्यम ते खोल (९० सेंमी),पाण्याचा चांगला निचरा होणारी,उथळ,हलक्या,क्षारयुक्त पाणथळ जमिनीत लागवड करण्याचे टाळावे. बागायती जमिनीत हेक्टरी १० टन आणि कोरडवाहू बागायती क्षेत्रामध्ये ५ टन शेणखत मिसळावे.

रासायनिक खते :

संकरित कापूस : १०० किलो नत्र, ५० किलो स्फुरद, ५० किलो पालाश प्रति हेक्टरी

सुधारित कापूस : ८० किलो नत्र, ४० किलो स्फुरद,४० किलो पालाश प्रति हेक्टरी

बीटी कापूस : १२५ किलो नत्र, ६५ किलो स्फुरद,६५ किलो पालाश प्रति हेक्टरी

पेरणीच्या वेळी २०टक्के नत्र,संपूर्ण स्फुरद आणि पालाश द्यावे. पेरणीनंतर ३० दिवसांनी ४० टक्के नत्र आणि पेरणीनंतर ६० दिवसांनी उर्वरित ४० टक्के नत्र द्यावे.

नत्र, स्फुरद व पालाश या प्रमुख घटकाव्यतिरिक्त मॅग्नेशिअम,गंधक,लोह,जस्त,मॅगनीज आणि बोरॉन या सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरज असते.

गंधक : २० किलो प्रति हेक्टरी

मॅग्नेशिअम सल्फेट : २० किलो प्रति हेक्टरी

झिंक सल्फेट : २५ किलो प्रति हेक्टरी

बोरॅक्स : ५ किलो प्रति हेक्टरी

टीप : माती परिक्षणानुसार सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करावा.

सोयाबीन

मध्यम खोलीची,चांगला निचरा होणारी,अत्यंत हलकी,उथळ तसेच मुरमाड जमिनीत लागवड करू नये.जास्त आम्लयुक्त,क्षारयुक्त किंवा रेताड जमिनीत पीक घेऊ नये. जमिनीत सेंद्रिय कर्बाचे प्रमाण चांगले असावे. मशागतीनंतर प्रति हेक्टरी १० टन शेणखत/कंपोस्ट खत मिसळावे.

पिकाला माती परिक्षणानुसार ५० किलो नत्र, :७५ किलो स्फुरद, :४५ किलो पालाश प्रति हेक्टरी द्यावे. तसेच २० किलो गंधक, २५ किलो झिंक सल्फेट आणि १० किलो बोरॅक्स प्रति हेक्टरी द्यावे.

पीक २० ते २५ दिवसांचे असताना सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे पिवळे पडल्याससुक्ष्म अन्नद्रव्य ५० मिलि प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

शेंगा लागण्याच्या अवस्थेत १९:१९:१९ आणि शेंगा भरण्याच्या अवस्थेत ०:५२:३४ या विद्राव्य खतांची १०० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यातून फवारणी करावी. पेरणीनंतर नत्रयुक्त खतांचा वापर टाळावा.

भुईमूग

मध्यम,भुसभुशीत,चुना आणि सेंद्रिय पदार्थ योग्य प्रमाणात असलेली,पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी. प्रति हेक्टरी १० टन शेणखत किंवा कंपोस्ट खत मिसळावे.

पिकाला माती परिक्षणानुसार प्रति हेक्टरी २५ किलो नत्र, ५० किलो स्फुरद किलो आणि जिप्सम ४०० किलो (पेरणीच्या वेळी आणि आऱ्या सुटताना प्रत्येकी २०० किलो) द्यावे.

डॉ.आदिनाथ ताकटे, ९४०४०३२३८९

(एकात्मिक शेती पद्धती संशोधन प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ,राहुरी,जि.नगर)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ativrushti Madat: अतिवृष्टीच्या मदतीवरुन घुमजाव, राज्याने केंद्राला प्रस्ताव दोन महिने उशिरा पाठवला, मोठा खुलासा

Rice Market: दर्जेदार तांदळाला बाजारपेठेत चांगली मागणी

Soybean Crisis: मर्यादित खरेदीमुळे शेतकऱ्यांचे २९२ कोटींचे नुकसान

Kapas Kisan App: क्लिष्ट ‘कपास किसान अ‍ॅप’; शेतकऱ्यांच्या डोक्याला ताप

Local Body Elections: कोल्हापूर जिल्ह्यात नगरपालिकांसाठी चुरशीने मतदान

SCROLL FOR NEXT