Fertilizer Stock : अकोला जिल्ह्यात युरिया, डीएपी खताचा मुबलक साठा

Urea Stock : अकोला जिल्ह्यात खरीप हंगाममाकरिता महिनानिहाय युरिया खताचा पुरवठा करण्यासाठी. कृषी आयुक्तालयाकडून खत उत्पादक कंपन्यांना ८८,७०० टन आवंटन वितरित करून देण्यात आलेले आहे.
Fertilizer stock
Fertilizer stockAgrowon

Akola News : जिल्ह्यात खरीप हंगामास सुरुवात झालेली असून, वितरकामार्फत शेतकऱ्यांना रासायनिक खते व बियाण्याची विक्री सुरू झालेली आहे. जिल्ह्यात युरिया व डीएपी खताचा मुबलक साठा उपलब्ध आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी दिली.

अकोला जिल्ह्यात खरीप हंगाममाकरिता महिनानिहाय युरिया खताचा पुरवठा करण्यासाठी. कृषी आयुक्तालयाकडून खत उत्पादक कंपन्यांना ८८,७०० टन आवंटन वितरित करून देण्यात आलेले आहे. यामध्ये युरिया खताचे १८,७०० टन व डीएपी १५,५०० टन आवंटन आहे.

Fertilizer stock
Chemical Fertilizer : रासायनिक खतांचा भरमसाठ वापर, जमिनीची सुपीकता होतेय का नष्ट

त्यानुसार उत्पादक कंपन्यांना ३१ मेअखेर अकोला जिल्ह्याकरिता एकूण १४९६ टन युरिया व डीएपी ७७५ टन खताचा पुरवठा करावयाचा होता. त्यानुसार खत उत्पादक कंपन्यांकडून जिल्ह्याकरिता ५ जूनअखेर ६४११ टन युरिया व डीएपी १०८७ टन खताचा पुरवठा झाला आहे. तसेच जिल्ह्यात ९६४८ टन युरिया व डीएपी २७८१ टन खताचा शिल्लक साठा आहे.

तसेच पुढील आठवड्यात आरसीएफ, इफ्को या कंपनीकडून २६०० टन युरियाचा व आरसीएफ, इफ्को व जीएसएफसी या कंपन्यांकडून एकूण ३००० टन डीएपीचा पुरवठा होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यामध्ये आवश्यक त्या खताचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे.

Fertilizer stock
Soil Fertility : जमीन सुपीकता जपत पीक उत्पादनात सातत्य

शेतकऱ्याना जवळच्या कृषी सेवा केंद्रातून आवश्यकतेनुसार युरिया व डीएपी खत खरेदी करावे. विक्रेत्यांकडे खत उपलब्ध असूनही ते विक्री करण्यास नकार देत असल्यास किंवा जादा दराने विक्री करीत असल्यास याची तक्रार तालुक्यातील कृषी अधिकारी यांच्याकडे करावी.

जिल्हास्तरावर शेतकऱ्यांना तक्रार करावयाची असल्यास जिल्हास्तरीय तक्रार निवारण समिती तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, व जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी यांच्याकडे करावी, असे आवाहनही किरवे यांनी केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com