Maratha Reservation  Agrowon
ॲग्रो विशेष

Maratha Reservation : ओबीसींना धक्का न लावता स्वतंत्र आरक्षण द्या

Maratha Reservation Update : ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे यावर सर्वांचे एकमत आहे, तरीही सरकारमधील मंत्री जाती-जातींत तेढ निर्माण करतात.

Team Agrowon

Nagpur News : ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे यावर सर्वांचे एकमत आहे, तरीही सरकारमधील मंत्री जाती-जातींत तेढ निर्माण करतात. सत्तेत असूनही ओबीसींना काही मिळाले नाही म्हणतात,

मग आजपर्यंत काय केले, असा सवाल करत विधानसभेत अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना इतर सदस्यांनी सुनावत मराठा आरक्षणाची मागणी केली. दरम्यान, मंगळवारी (ता.१२) रात्री झालेल्या चर्चेदरम्यान माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही भुजबळ यांना सुनावत, ‘तुम्हाला बोलायचे असेल तर आधी राजीनामा द्या आणि मग बोला,’’ असे सांगितले.

‘‘सदस्यांची घरे जाळली म्हणून सांगता, मग तुमच्या बाजूला बसणाऱ्या गृहमंत्र्यांना का सांगत नाही, ओबीसींना निधी मिळाला नाही म्हणून सांगता, मग शेजारी बसणाऱ्या अर्थमंत्र्यांना का सांगत नाही,’’ अशा शब्दांत आमदार बच्चू कडून यांनी छगन भुजबळ यांना सुनावले.

बुधवारी (ता.१३) दुपारच्या सत्रात मराठा आरक्षणावरील चर्चा सुरू करण्यात आली. भाजपच्या आशिष शेलार यांनी मराठा समाजासंदर्भातील आकडेवारी सादर केली. शालेय आरक्षणात नेमका किती गुणांचा फरक पडतो हे महाराष्ट्रसमोर आले पाहिजे.

टिकणारे, तसेच ओबीसी आरक्षणाला नख न लावता ते दिले पाहिजे. इंद्रा सहानी आणि सुप्रीप कोर्टाच्या निकालावर टिकणारे आरक्षण दिले पाहिजे. ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत त्यांना आरक्षण दिले पाहिजे, असेही ते म्हणाले.

भास्कर जाधव, शंभूराज देसाईंनी घेरले

छगन भुजबळ भाषणाला उभे राहिल्यानंतर त्याला शिवसेनेच्या भास्कर जाधव यांनी आक्षेप घेतला. मंत्री प्रस्तावाला उत्तर द्यायला उभे आहेत का, असा सवाल केला. त्यावर अध्यक्षांनी या आधीही मंत्र्यांनी प्रस्तावावर भाषण केले आहे, असे सांगत बोलण्याची संधी दिली.

त्यावर शंभूराज देसाई यांनी जर भुजबळ बोलत असतील तर मलाही त्यांच्यानंतर बोलण्यास संधी द्या. मला त्यांच्यापेक्षा वेगळे बोलायचे आहे, असे सांगत भुजबळांना घेरले. तर भुजबळांनी आकडेवारी सादर करत मराठ्यांना सरसकट आरक्षणाला विरोध केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rainfall Update: जुलै महिन्यात ३८ मंडलांत कमी पाऊस

Rural Development: सोसायट्या गावाच्या विकासाचे केंद्र बनाव्यात : मंत्री बाबासाहेब पाटील

Jeevamrut Initiatives: एकाच दिवसात ५०० लिटर जिवामृत निर्मितीचा उपक्रम

Crop Damage Compensation: काजू, आंबा उत्पादक नुकसान भरपाईपासून वंचित, पंचनाम्यांतील तांत्रिक अडचणी दूर करण्याची मागणी

Crop Insurance Scheme: बीडमध्ये २.३१ लाख शेतकऱ्यांचे पीकविमा संरक्षण

SCROLL FOR NEXT