Farm Road Agrowon
ॲग्रो विशेष

Farm Road : ग्रामसमृद्धीसाठी शेत तिथे रस्ता द्या

Rural Development : शेतकऱ्यांमध्ये शेतरस्त्यांच्या कारणामुळे मोठे वाद निर्माण झाले असून भविष्यात हा अनर्थ टाळण्यासाठी राज्यव्यापी शिव पाणंद शेतरस्ता चळवळ उभी केली आहे.

Team Agrowon

Nashik News : राज्यात शेतरस्त्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असून दिवसेंदिवस फौजदारी स्वरूपाच्या घटना वाढत चालल्या आहेत. शेतकऱ्यांमध्ये शेतरस्त्यांच्या कारणामुळे मोठे वाद निर्माण झाले असून भविष्यात हा अनर्थ टाळण्यासाठी राज्यव्यापी शिव पाणंद शेतरस्ता चळवळ उभी केली आहे.

शेतकऱ्यांना शेत तिथे रस्ता मिळून देऊन शेवटच्या शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी संघर्ष करणार, अशी माहिती महाराष्ट्र राज्य शिव पानंद शेतरस्ता चळवळीचे शरद पवळे व राज्य समन्वयक दादासाहेब जंगले यांनी दिली.

शेतकऱ्यांना दळणवळणासाठी शेतीला बारामाही दर्जेदार शेतरस्त्यांची आवश्यकता असल्याचे निदर्शनात आणत वेळोवेळी निवेदने, दिली आंदोलने केली. मात्र न्याय न मिळाल्याने जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवारी (ता. १६) शेतकऱ्यांकडून पेरूवाटप आंदोलन करण्यात आले. या वेळी महाराष्ट्र राज्य शिव पानंद शेतरस्ता चळवळीचे पवळे, जंगले, प्रकाश होन, दीपक शिंदे, ज्ञानेश्वर घोटेकर, भाऊसाहेब तासकर, गणेश वलवे आदींसह शेतकरी उपस्थित होते.

सरकार बदलते शासन निर्णय बदलतात; परंतु त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नाही. यासाठी महाराष्ट्र राज्य शिव पाणंद शेतरस्ता चळवळीच्या वतीने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेत प्रशासकीय, न्यायालयीन पातळीवर काम सुरू केले आहे. शेतीची वाढत चाललेली तुकडेवारी शेतीमधील कमी होणाऱ्या मनुष्यबळाच्या उपलब्धतेमुळे यांत्रिकीकरण ही अपरिहार्य बाब झाली आहे.

शेतीमाल बाजारात पोहोचवण्याकरिता व पेरणी अंतर्भागात कापणी मळणी या स्वरूपाची यंत्रसामग्री शेतीपर्यंत जाण्यासाठी शेतीपूरक व्यवसाय सर्पदंश, वीज पडणे, पूर, आग लागणे या स्वरूपाच्या आपत्कालीन घटनांमुळे जीवितहानीचे वाढते धोके आहेत.

त्याचबरोबर शेतकरी शेतीत वास्तव्यास असून शालेय विद्यार्थी, शेतकऱ्यांना दळणवळणासाठी शेतीला बारामाही दर्जेदार शेतरस्त्यांची आवश्यकता असून निवेदने, आंदोलने करून न्याय न मिळाल्याने या जिल्हाधिकारी कार्यालयात बाधित शेतकऱ्यांनी येत परिसरात पेरूवाटप केले. न्याय मिळाला नाही तर यापेक्षाही तीव्र आंदोलनाचा इशारा आंदोलकांनी दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: बेदाण्याचे दर तेजीत, काकडीला मागणी, चिकू महागला; बाजरीचे दर स्थिर, तुरीचे दर दबावात

Flood Management : महापूर येऊ नये यासाठी काय उपाययोजना केल्या?

Crop Loan : खरिपासाठी ११७९ कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप

Irrigation Subsidy : ठिबक अनुदानाबाबत संभ्रम

Farmer Foreign Tour : राज्यातील शेतकऱ्यांना देशाबाहेर अभ्यास दौऱ्याची संधी

SCROLL FOR NEXT