Onion Export Ban Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Export Ban : त्वरित निर्यातबंदी उठवून शेतकऱ्यांना न्याय द्या

Onion Market : केंद्र सरकारच्या कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाविरोधात शरद जोशीप्रणित शेतकरी संघटना व स्वतंत्र भारत पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी (ता. २५) नामपूर (ता. सटाणा) येथे बाजार समितीसमोर रास्ता रोको केला.

मुकूंद पिंगळे

Nashik News : केंद्र सरकारच्या कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाविरोधात शरद जोशीप्रणित शेतकरी संघटना व स्वतंत्र भारत पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी (ता. २५) नामपूर (ता. सटाणा) येथे बाजार समितीसमोर रास्ता रोको केला. कांदा उत्पादकांची परिस्थिती खूपच बिकट झाली आहे. केंद्र सरकारने त्वरित निर्यातबंदी उठवून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी या वेळी करण्यात आली.

सध्या मिळणाऱ्या दरामध्ये उत्पादन खर्च निघणे मुश्कील झाल्याने कांदा उत्पादकांची आर्थिक कोंडी वाढली आहे. त्यामुळे बागलाण परिसरातील शेतकरी संघटनेच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी रास्ता रोको केला.

या वेळी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष शैलेंद्र कापडणीस, स्वतंत्र भारत पक्षाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रवीण आहिरे, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब चौधरी, शेतकरी संघटनेचे बागलाण तालुका उपाध्यक्ष देविदास आहिरे, युवा आघाडीचे नयन सोनवणे, बाजार समितीचे संचालक किरण वाघ, गणेश गायकवाड, बाबाजी शिरोळे, लहू आहिरे उपस्थित होते.

व्यापारी संघटनेचे सचिन मुथा, वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनास पाठिंबा दिला. आंदोलनस्थळी जायखेडा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाट यांनी निवेदन स्वीकारले. त्यानंतर रास्ता रोको मागे घेण्यात आला.

‘‘कांद्याचा उत्पादन खर्च प्रतिकिलो सुमारे २० रुपये असताना लूट भावाने शेतकऱ्यांना कांदा विकावा लागत आहे. सरकार शेतकऱ्यांना आत्मनिर्भर का होऊ देत नाही,’’ असा सवाल प्रवीण अहिरे यांनी केला.

संघटनेच्या मागण्या

- सर्व शेतीमालावरील निर्यातबंदी कायमस्वरूपी उठवावी

- शेतीमाल व्यापारातील सरकारचा हस्तक्षेप कायमचा बंद करावा

- सक्तीची कर्जवसुली बंद करून शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती द्यावी

- शेतीसाठी पूर्णवेळ व पूर्ण दाबाने वीजपुरवठा करावा

- पीकविम्यात होणारी शेतकऱ्यांची फसवणूक बंद करावी

- पीकविम्याचा योग्य लाभ देणारी योजना अमलात आणावी

कांद्याचे दर कमी असताना सरकार झोपा काढते का? कांद्याचे दर ५०० ते ८०० रुपयांवर आल्याने मातीमोल भावाने कांद्याची विक्री सुरू आहे. निर्यातबंदीचे अस्त्र काढून सरकार शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चोळत आहे.
- शैलेंद्र कापडणीस, जिल्हा उपाध्यक्ष, शेतकरी संघटना.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pomegranate Crop Loss: अतिवृष्टीने राज्यातील डाळिंबे काळवंडली

Agriculture Department Corruption: कृषी अधिकाऱ्यांच्या खासगी कंपन्यांची चौकशी ‘एसीबी’कडे

Maharashtra Weather: राज्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता

Maharashtra Farmer Flood Package: अतिवृष्टीच्या ‘पॅकेज’चा फुसका बार; शेतकऱ्यांशी पुन्हा एकदा शब्दांची चलाखी

Crop Damage Compensation : संत्रा-मोसंबी बागायतदारांना भरपाई देण्याची मागणी

SCROLL FOR NEXT