Farmer Protest Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer Loan Waive : अवकाळीग्रस्तांना सरसकट मदत, कर्जमाफी द्या

Farmer Protest on Loan Waive : अवकाळी पाऊस आणि गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट मदत आणि कर्जमाफी द्यावी.

Team Agrowon

Nashik News : अवकाळी पाऊस आणि गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट मदत आणि कर्जमाफी द्यावी, या मागणीसाठी शेतकऱ्यांसह शिवसेनेच्या ठाकरे गटातर्फे सोमवारी (ता. ४) शेकडो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चाद्वारे ठाकरे गटाने शक्तिप्रदर्शन केल्याचे दिसून आले.

शिवसेनेच्या शालीमार येथील कार्यालयापासून सुरू झालेल्या मोर्चात २५ बैलगाड्यांसह अनेक शेतकरी, त्याच्या ट्रॅक्टरसह सहभागी झाल्याने मोर्चा लक्षवेधी ठरला. शालिमार, नेहरू उद्यान, रेड क्रॉस सिग्नल, महात्मा गांधी रोड, अशोकस्तंभ या मार्गाने मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.

तेथे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले. शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, सुनील बागूल, माजी आमदार अनिल कदम, निर्मला गावित, योगेश घोलप, कुणाल दराडे, देवानंद बिरारी आदींसह कार्यकर्ते, शेतकरी सहभागी झाले होते.

जिल्ह्यात अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून प्रतिहेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी. एक रुपयात पीकविमा योजनेत विमा काढूनही शेतकऱ्यांना मदत जाहीर करत नाही. अवकाळी पाऊस झाल्याचे विमा कंपनीला माहीत असूनसुद्धा शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका विमा कंपनीची दिसत नाही.

नुकसानीबाबत ७२ तासांच्या आत विमा कंपनीला ऑनलाइन किंवा फोनद्वारे कळवावे, असे सांगितलेले आहे. मात्र या कंपनीची वेबसाइट बंद आहे. संपर्कासाठी दिलेल्या क्रमांकावर संपर्कच होत नाही. विमा कंपनी हेतुपुरस्सर दिलेले नंबर आणि वेबसाइट बंद ठेवून विमाधारक शेतकऱ्यांना मानसिक व आर्थिक त्रास देऊन त्यांची फसवणूक करीत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.

शेतकऱ्यांना शासनाने हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत जाहीर करावी, दुष्काळग्रस्त भागात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी उपाययोजना करावी, चारा उपलब्ध करून देण्यात यावा,

पिकविम्यातील जाचक अटी रद्द कराव्यात, सरसकट पीकविमा रक्कम बाधित शेतकऱ्यांना मिळावी, खरीप व रब्बीतील पिकांना लागू असलेला पीकविमा सरसकट शेतकऱ्यांना मिळावा, सरसकट कर्जमुक्ती करावी, आदी मागण्या करण्यात आल्या.

मागील वर्षाची मदत नाही

गेल्या वर्षीं अवकाळी पावसाने द्राक्ष, कांदे, कपाशी, टोमॅटो, कोबी, फ्लॉवर, मूग, उडीद, गहू, बाजरी, सोयाबीन, द्राक्ष, मका, तूर, तीळ या पिकांचे नुकसानीचे पंचनामे तत्काळ करून भरपाई देणार होते. शेतकऱ्यांना तसे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप मागील वर्षाची नुकसान भरपाई मिळालेली नाही अशाही तक्रारी मांडल्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Farmer Loan Waiver : दुसऱ्या टप्प्यात कर्जमाफीचे ५ हजार ८६ कोटी रुपये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कर्जखात्यावर वितरीत

Wild Vegetable Conservation: रानभाज्यांच्या बियाणे बँकेसाठी प्रयत्न करा : प्रसाद

Fake Agricultural Products: नामवंत कंपनीच्या नावाने बनावट पोषकविक्री रॅकेटचा पर्दाफाश

Agrowon Podcast: तुरीच्या दरात चढ-उतार, हळदीच्या भावात बदल, वांगी दरात घसरण, पालकचे भाव टिकून तर संत्री दरात वाढ

International Agriculture Workshop: युवा शेतकरी प्रताप मारोडे यांची आंतरराष्ट्रीय कार्यशाळेसाठी निवड

SCROLL FOR NEXT