Crop Compensation Agrowon
ॲग्रो विशेष

Loan Waiver : शेतकऱ्यांना तातडीने सरसकट कर्जमाफी द्या

Crop Compensation : नागपूर जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. राज्य शासनाने शेतीचे सर्वेक्षण करून त्यांना तातडीने मदत करावी.

Team Agrowon

Nagpur News : नागपूर जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. राज्य शासनाने शेतीचे सर्वेक्षण करून त्यांना तातडीने मदत करावी.

तसेच जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी मागणी शेतकरी व कामगार संरक्षण दल या संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली आहे.

नागपूर जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांत अवकाळी पावसाने थैमान घातले. गारपीट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या पावसाने शेतातील पीक मोठ्या प्रमाणात नष्ट झाले. गहू, हरभरा, कपाशी, मिरची आणि भाजीपाल्याचे पीक भुईसपाट झाले.

यात शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. शेतात लावलेला खर्चसुद्धा निघणे मुश्कील झाले. कर्ज घेऊन शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा की कर्ज फेडायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

संकटातून त्याला बाहेर काढणे आवश्यक आहे, असे मत संघटनेचे अध्यक्ष राजानंद कावळे यांनी व्यक्त केले. शासनाने सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई तसेच त्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना राजानंद कावळे आणि शिष्टमंडळाने केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT