Fruit Orchard Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Fruit Orchard Damage : फळबागांना हेक्टरी २ लाख तत्काळ मदत द्या

सटाणा तालुक्यातील वादळी वाऱ्यांसह पाऊस आणि गारपिटीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या फळबागांना राज्य शासनाने हेक्टरी दोन लाख रुपये तर इतर पिकांना हेक्टरी दीड लाखांची तत्काळ मदत द्यावी.

Team Agrowon

Nashik Agriculture News : सटाणा तालुक्यातील वादळी वाऱ्यांसह पाऊस (Rain) आणि गारपिटीमुळे (Hailstorm) नुकसानग्रस्त झालेल्या फळबागांना राज्य शासनाने हेक्टरी दोन लाख रुपये तर इतर पिकांना हेक्टरी दीड लाखांची तत्काळ मदत द्यावी.

कांदा अनुदानातील जाचक अटी शिथिल कराव्यात, शेतकऱ्यांना थकीत कर्जमाफी व वीजबिल माफी मिळावी तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये तातडीने अनुदान मिळावे, अशी आग्रही मागणी माजी आमदार संजय चव्हाण यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

तालुका दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री श्री.शिंदे यांची भेट घेऊन माजी आमदार श्री.चव्हाण यांनी निवेदन दिले आणि शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष केशवराव मांडवडे, शहर कार्याध्यक्ष मनोज सोनवणे, तालुका कार्याध्यक्ष संजय पवार, पंचायत समितीचे माजी सभापती रामकृष्ण अहिरे, अरुण सोनवणे आदींसह शेतकरी उपस्थित होते.

सातत्याच्या नैसर्गिक संकटांमुळे शेतकरी उद्‌ध्वस्त झाल्याने तालुक्यातील फळबागांसाठी हेक्टरी दोन लाख रुपये तर इतर सर्व पिकांसाठी हेक्‍टरी दीड लाख रुपये मदत देऊन बळीराजाला दिलासा द्यावा.

कांदा उत्पादकांना जाहीर केलेल्या अनुदान योजनेतील जाचक अटींमुळे ९० टक्‍के कांदा उत्पादक शेतकरी या अनुदानापासून वंचित राहणार असल्याने कांदा अनुदानासाठी ७/१२ उताऱ्यावर पीक पाहणीची अट तातडीने रद्द करावी, गुजरात व मुंबई (वाशी) येथील बाजार समित्यांमध्ये विकलेल्या कांद्यालाही अनुदान द्यावे.

महाविकास आघाडी सरकारने नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने पुढे कायम ठेवल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान होत आहे.

मात्र तालुक्‍यातील नियमित कर्जफेड करणाऱ्या ४० टक्‍के शेतकऱ्यांनाच त्याचा लाभ झाला असून ६० टक्के शेतकरी अजूनही या अनुदानापासून वंचित आहेत. त्यामुळे अडचणीच्या काळातही नियमित कर्जफेड करणाऱ्या उर्वरित शेतकऱ्यांना तत्काळ ५० हजार रुपयांचे अनुदान द्यावे, अशा विविध मागण्या श्री.चव्हाण यांनी निवेदनाद्वारे केल्या आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought Relief: शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार जमा होण्यास सुरुवात, जयकुमार गोरेंची माहिती

Nagpur Agriculture : नागपुरात कृषी विभागाचा कारभार रामभरोसे; पदे रिक्त असल्याने योजनांच्या अंमलबजावणीला ब्रेक!

Karjmafi Glitches : शेतकऱ्यांची कोंडी: सरकारच्या तांत्रिक चक्रव्यूहात अखेरची कर्जमुक्ती योजना अडकली!

November Rain: नोव्हेंबरमध्ये एमजेओमुळे पावसाचे प्रमाण वाढणार आहे का ?

Scheme Glitches : सातारा जिल्ह्यात शासकीय योजनांच्या त्रुटींचा जाच; लाभाऐवजी शेतकऱ्यांनाच सहन करावा लागतोय मनस्ताप!

SCROLL FOR NEXT