Crop Damage  Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage Compensation : ‘भुदरगड तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या’

Kolhapur News : भुदरगड तालुक्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे हेदवडे, गिरगावसह परिसरात वादळी वारा व ढगफुटी पावसाने ऊस पीक पूर्णतः कोसळले आहे.

Team Agrowon

Kolhapur News : भुदरगड तालुक्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे हेदवडे, गिरगावसह परिसरात वादळी वारा व ढगफुटी पावसाने ऊस पीक पूर्णतः कोसळले आहे. ऊस पीक उद्‍ध्वस्त झाल्याने शेतकरी अडचणीत आला आहे.

पावसाने झोडपून काढल्याने हातातोंडाशी आलेले ऊस पीक वाया गेले आहे. महापुराने तारले पण परतीच्या पावसाने मारले अशी अवस्था या परिसरातील शेतकऱ्यांची झाली आहे. आर्थिक नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

दोन वर्षे फये प्रकल्पाची गळती काढण्यासाठी हेदवडे, गिरगाव परिसरातील शेतकऱ्यांनी ऊस पीक घेतले नव्हते यंदा ऊस लागण केल्याने ऊस पीक चांगले आले होते. पण नुकताच झालेला ढगफुटी पावसाने व वादळाने ऊसपीक भुईसपाट झाले आहे.

तालुक्यात ऊस पिकापाठोपाठ भात पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते, मात्र पावसामुळे पिके वाया गेल्याने बळीराजा पूर्णतः आर्थिक अडचणीत आला आहे. यंदा कापणीच्या घाईतच पाऊस झाल्याने भात कापणी खोळंबली आहे तर काही ठिकाणी कापणी अर्ध्यावरच राहून शेतात कापलेले पीक पडून आहे.

शासनाने ऊस पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई द्यावी. ऊसतोड द्यावी अशी मागणी युवराज देसाई, दादासो वैद्य, निवृत्ती वैद्य, तुकाराम वैद्य, भारत वैद्य आदींसह हेदवडे, गिरगावसह परिसरातील शेतकऱ्यांमधून होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT