Fruit Crop Fertilizers  Agrowon
ॲग्रो विशेष

Fruit Crop Fertilizers : फळझाडांना द्या संतुलित खते

Team Agrowon

डॉ. आदिनाथ ताकटे, राहुल पाटील

Agriculture Fertilizers : फळझाडांची लागवड केल्यानंतर नियमित आणि भरपूर उत्तम दर्जाच्या फळ उत्पादनासाठी जमीन सुपीक ठेवणे जरुरीचे आहे. सर्वसाधारणपणे फळझाडांना जून-जुलै, सप्टेंबर-ऑक्टोबर व जानेवारी-फेब्रुवारी या महिन्यात खते द्यावीत.

खते देताना प्रत्येक झाडांचा बहर येण्याचा व फळे पक्व होण्याचा कालावधी लक्षात घेऊन खतमात्रा ठरवावी. जून-जुलैमध्ये शेणखत तसेच स्फुरद व पालाश यांची संपूर्ण मात्रा द्यावी. नत्राची मात्रा एक ते दोन समान हप्त्यात विभागून द्यावी. खते देण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.

खते देण्याची पद्धत

खते देताना मोठ्या झाडाखाली खोडापासून एक मीटर लांब ४० ते ५० सेंमी रुंद आणि १५ सेंमी खोल वर्तुळाकार चर काढून चरामध्ये प्रथम पालापाचोळा, शेणखत आणि त्यानंतर रासायनिक खते टाकून नंतर चर मातीने बुजवावा.

चिकू

पूर्ण वाढलेल्या प्रत्येक चिकू झाडास १०० किलो शेणखत प्रति झाड प्रमाणे द्यावे.

शिफारशीत मात्रा ः नत्र:स्फुरद:पालाश (३:२:२ किलो). जून-जुलैमध्ये ३ किलो नत्र (६.५ किलो युरिया), २ किलो स्फुरद (१२.५ किलो एसएसपी) व २ किलो पालाश (३.५ किलो एमओपी) याप्रमाणे द्यावे. उर्वरित नत्र सप्टेंबर महिन्यात द्यावे.

पेरू

पूर्ण वाढलेल्या झाडास ५० किलो शेणखत.

शिफारशीत खत मात्रा : नत्र:स्फुरद:पालाश (९००:३००:३०० ग्रॅम प्रतिझाड) म्हणजेच दोन किलो युरिया, दोन किलो एसएसपी व अर्धा किलो एमओपी द्यावे. यापैकी निम्मे नत्र (एक किलो युरिया) बहराच्या वेळी व उर्वरित मात्रा फलधारणेनंतर द्यावी. तर स्फुरद व पालाश यांची मात्रा एकाच हप्त्यात बहराच्या वेळी द्यावी.

लिंबू

पूर्ण वाढलेल्या चार वर्षांच्या झाडास जून-जुलैमध्ये १५ किलो शेणखत, १५ किलो निंबोळी पेंड द्यावे.

शिफारशीत मात्रा ः नत्र:स्फुरद:पालाश (६००:३००:६०० ग्रॅम प्रतिझाड) म्हणजेच १५:१५:१५ एक किलो, अर्धा किलो एमओपी.

सप्टेंबर महिन्यात ३०० ग्रॅम युरिया व जानेवारी महिन्यात ३०० ग्रॅम युरिया द्यावा.

वरील खतांशिवाय व्हॅम ५०० ग्रॅम अधिक पीएसबी १०० ग्रॅम अधिक ट्रायकोडर्मा हरजियानम १०० ग्रॅम अधिक ॲझोस्पिरिलम १०० ग्रॅम प्रमाणे द्यावे.

सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता आढळल्यास झिंक सल्फेट (०.५ टक्के), मॅग्नेशिअम सल्फेट (०. ३ टक्के), फेरस सल्फेट व कॉपर सल्फेट या सूक्ष्म अन्नद्रव्यांची एकत्रित फवारणी करावी.

आंबा

पूर्ण वाढलेल्या झाडास (१० वर्ष व अधिक) जून-जुलै महिन्यात ५० किलो शेणखत, नत्र १५०० ग्रॅम, स्फुरद ५०० ग्रॅम, ५०० ग्रॅम पालाश (दीड किलो युरिया, तीन किलो एसएसपी व १ किलो एमओपी) या प्रमाणे प्रतिझाड मात्रा द्यावी. सप्टेंबर व फेब्रुवारी महिन्यात पाऊण किलो युरिया प्रत्येकी द्यावा.

मोसंबी

पूर्ण वाढलेल्या पाच वर्षांच्या प्रत्येक झाडास २० किलो शेणखत, १५ किलो निंबोळी पेंड द्यावे.

शिफारशीत मात्रा : नत्र:स्फुरद:पालाश ( ८००:३००:६०० ग्रॅम प्रतिझाड) ची मात्रा पुढीलप्रमाणे विभागून द्यावी. जानेवारीमध्ये ७०० ग्रॅम युरिया अधिक ९०० ग्रॅम एसएसपी, मार्चमध्ये ७०० ग्रॅम युरिया अधिक ९०० ग्रॅम एसएसपी, मे महिन्यात ३५० ग्रॅम युरिया अधिक ५०० ग्रॅम एमओपी, जुलै महिन्यात २५० ग्रॅम एमओपी आणि सप्टेंबर महिन्यात २५० ग्रॅम एमओपी द्यावे.

बहार धरतेवेळी वरील खतांव्यतिरिक्त व्हॅम ५०० ग्रॅम अधिक पीएसबी १०० ग्रॅम अधिक ट्रायकोडर्मा हरजियानम १०० ग्रॅम अधिक ॲझोस्पिरिलम १०० ग्रॅम प्रमाणे द्यावे.

फळझाडांच्या वयोमानानानुसार द्यावयाची खतमात्रा

फळझाड फळझाडाचे वय (वर्ष) शेणखत/कंपोस्ट खत (किलो /झाड) रासायनिक खतांची मात्रा (ग्रॅम प्रति झाड)

नत्र (युरिया) स्फुरद (एसएसपी) पालाश (एमओपी)

जून-जुलै सप्टेंबर-ऑक्टोबर जानेवारी-फेब्रुवारी जून-जुलै सप्टेंबर-ऑक्टोबर जानेवारी-फेब्रुवारी

आंबा १० ५० ७५० (१६२७) ७५० (१६२७) -- ५०० (३१२५) ५०० (८३५) -- --

चिकू १० १०० १५०० (३२५५) १५०० (३२५५) -- २००० (१२५००) २००० ३३४०) -- --

पेरू ५ ५० ४५० (९७७) ४५० (९७७) -- ३०० (१८७५) ३०० (५०१) -- --

अंजीर ५ ५० ४५० (९७७) ४५० (९७७) -- २५० (१५६२) २७५ (४६०) -- --

लिंबू ४ १५ ३०० (६५१) ३०० (६५१) -- ३०० (१८७५) ६०० (१००२) -- --

मोसंबी ५ १५ ३०० (६५१) -- -- १०० (६२५) १०० (१६७) -- --

डाळिंब ३ ५० ३०० (६५१) ३०० (६५१) -- २५० (१५५०) २५० (४४०) -- --

नारळ ५ ५० ३३३ (७२३) ३३३ (७२३) ३३३ (७२३) ५०० (३१२५) ३३३ (५५६) ३३३ (५५६) ३३३ (५५६)

(टीप: खते देताना फळझाडांचा बहार लक्षात घेऊनच खतमात्रा निश्चित करावी.)

- डॉ. आदिनाथ ताकटे, ९४०४०३२३८९ (एकात्मिक शेती पद्धती संशोधन प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Crop : वाढलेल्या सोयबीनमध्ये शेंगांचा शोध

Agricos Welfare Society : ‘कृषी’च्या विद्यार्थ्यांकडून सेवाभावी संस्थेला मदत

E-Peek Pahani : छप्पन टक्के शेतकऱ्यांनी नोंदविली ई-पीकपाहणी

Crop Damage Compensation : नांदेडमधील शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई

Integrated Agriculture : एकात्मिक शेती पद्धतीच्या यशस्वी मॉडेलचा प्रसार व्हावा

SCROLL FOR NEXT