Milk dairy Agrowon
ॲग्रो विशेष

Milk Subsidy : दुधासाठी लिटरला ५ रुपये अनुदान द्या

Milk Rate : दूध भुकटीचे घटलेले दर पर्यायाने दूध दरातील घसरण लक्षात घेता दूध उत्पादकांना त्यांच्या बँक खात्यात थेट प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे.

Team Agrowon

Pune News : दूध भुकटीचे घटलेले दर पर्यायाने दूध दरातील घसरण लक्षात घेता दूध उत्पादकांना त्यांच्या बँक खात्यात थेट प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे.

पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे (कात्रज डेअरी) अध्यक्ष भगवान पासलकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत नागपूर येथे झालेल्या बैठकीत ही मागणी केली.

राज्यातील दूध उत्पादकांचे प्रश्‍न तसेच दूधदरात मोठी घसरण झाल्याने नागपूर येथे बैठक झाली. थेट दूध उत्पादकांच्या बँक खात्यावर अनुदान दिल्यास त्यांना दिलासा मिळेल. सद्यःस्थितीत दुधाचे दर २५ ते २६ रुपये प्रति लिटरपर्यंत खाली आले आहेत.

पशुखाद्य आणि चाऱ्याच्या वाढत्या किमती तसेच उत्पादन खर्च याचा विचार करता उत्पादकांना प्रतिलिटर चार ते पाच रुपये तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे अनुदान देण्याचा निर्णय तत्काळ दिल्यास त्यांना दिलासा मिळू शकेल, असे पासलकर यांनी म्हटले आहे.

पुणे जिल्हा दूध संघाचे सध्या सरासरी दैनंदिन गायीच्या दूध संकलनापैकी ८० ते ८५ हजार लिटर दूध पॅकिंगद्वारे विक्री करण्यात येते. तर १० हजार लिटर दुधातून दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती होते. मात्र, उर्वरित दूध २९ रुपये दराने खासगी डेअरीला विकण्यात येत असल्याने मोठा तोटा सहन करावा लागत आहे.

यामुळे उत्पादकांना थेट अनुदान द्यावे किंवा शिल्लक दूध सरकारने रूपांतरासाठी घ्यावे. जेणे करून संघाला आणि उत्पादकांना तोटा होणार नाही, अशी मागणी संघाकडून करण्यात आली.

विक्रीच्या दरापेक्षा सातत्याने खरेदी दर वाढवून दिला जात असल्याने संघाला मोठा तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे अनुदान दिल्यास हा तोटा कमी होण्यास मदत होईल. याबाबतची मागणी बैठकीत तसेच, निवेदनाद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि दुग्ध व्यवसाय विकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली आहे.
- भगवान पासलकर, अध्यक्ष, पुणे जिल्हा दूध संघ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT