Team Agrowon
आपला दुग्ध व्यवसाय फायद्यात आहे की? तोट्यात? हे शोधून काढायच असेल तर एक लिटर दुधाचा खर्च काढता आला पाहिजे.
एक लिटर दुधाचा खर्च काढायचा असेल तर गायीची किंमत, तिला दिल जाणार खाद्य, औषधांचा खर्च, गोठ्यामध्ये गायींसाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तू या मध्ये मिल्कींग मशीन या सारख्या गोष्टींचा समावेश होतो.
मजूराचा खर्च किती या सगळ्या गोष्टीचा खर्च काढून मगच गायीच्या एक लिटर दुधाचा खर्च निघतो.
एचएफ गायीच्या एक लिटर दुधाचा खर्च काढायचा झाला तर २७ ते २८ रुपये खर्च येतो.
संकरित गायीने एका वेतात तीन ते पाच हजार लिटर दूध दिलेच पाहिजे तरच हा खर्च २७ ते २८ रुपये प्रती लिटर पर्यंत येतो.
जर गायीने एका वेतात तीन ते पाच हजार लिटर दूध न देता कमी दिल तर हा खर्च वाढतो. दूध जर वाढल म्हणजे गायीने एका वेतात तीन ते पाच हजार लिटर पेक्षा दूध जर जास्त दिल तर हा खर्च कमी होतो.