Orange Processing  Agrowon
ॲग्रो विशेष

Orange Processing : संत्रा प्रक्रिया उद्योगाला बूस्ट द्या

Team Agrowon

Amaravati News : संत्रापट्ट्यात प्रक्रियेला प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने मोर्शी तालुक्‍यातील ठाणाठुणी येथे संत्रा प्रक्रिया प्रकल्पाची पायाभरणी झाली. परंतु गेल्या आठ वर्षांत हा प्रकल्प कार्यान्वित झाला नाही.

परिणामी संत्रा उत्पादकांच्या पदरी निराशा पडली आहे. शासनाने या प्रकल्पाला बूस्ट द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाचे तालुका उपाध्यक्ष रूपेश वाळके यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रातून केली आहे.

विदर्भात संत्र्याखालील सर्वाधिक १ लाख हेक्‍टर क्षेत्र असून त्यापैकी ७० हजार हेक्‍टर क्षेत्र एकट्या अमरावती जिल्ह्यात आहे. मात्र प्रक्रिया उद्योगाचा अभाव असल्याने दरवर्षी हंगामाच्या सुरुवातीला दर दबावात राहतात, अशी स्थिती आहे.

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने मोर्शी तालुक्‍यातील ठाणाठुणी येथे जैन व कोकाकोला यांच्या संयुक्‍त भागीदारीतील प्रकल्पाला प्रोत्साहन देण्यात आले. या ऑरेंज उन्नती प्रकल्पाची मुहूर्तमेढ ३१ ऑगस्ट २०१६ व ३० डिसेंबर २०१६ रोजी रोवली गेली.

आंबीया व मृग बहारातील छोट्या आकाराच्या संत्रा फळावर या ठिकाणी प्रक्रिया होणार होती. त्यामुळे लहान आकारातील फळांना बाजारपेठ उपलब्ध होणार असल्याने मोठ्या व मध्यम आकाराच्या फळांचा बाजारही तेजीत राहील, असे अपेक्षित होते.

मात्र गेल्या आठ वर्षांत हा प्रक्रिया प्रकल्प तसूभरही पुढे सरकला नाही. परिणामी संत्रा बागायतदारांचे स्वप्न धुळीस मिळाले आहे. तरी या प्रकल्पाला गती देण्याची मागणी करण्यात आली आहे.

संत्रा उत्पादकांचे हित जपण्याच्या नावाखाली येथे कंपन्यांकडून रोपवाटिका तयार करण्यात आली. व्हॅलेन्सिया जातीच्या कलमांची प्रतिरोप २५० प्रमाणे विक्री करण्यात आली. या जातीच्या संत्र्याची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांकडून लागवडीनंतर कोणीही फळे घेण्यास तयार नाही. त्यामुळे संत्रा बागायतदारांची मोठी अडचण झाली आहे.
- रूपेश वाळके, तालुका उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean MSP Procurement : सरकार सोयाबीनचे पेमेंट २ दिवसांत देणार ? उद्यापासून हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी नावनोंदणी सुरु होणार

Soybean Cotton Subsidy : दीड लाखावर शेतकरी कापूस, सोयाबीन अर्थसाह्यापासून वंचित राहण्याची शक्यता

E-Peek Pahani : खरिपातील ७ लाख ३४ हजार हेक्टर क्षेत्राची ई-पीकपाहणी

Agrowon Podcast : कांदा भावात नरमाई; कापूस, सोयाबीन, डाळिंब तसेच काय आहेत आले दर ?

Strawberry Nurseries Rain Damage : पावसाने स्ट्रॉबेरी रोपवाटिकांचे नुकसान, लागवडी रखडल्याने शेतकरी चिंतेत

SCROLL FOR NEXT