Ginning Pressing Agrowon
ॲग्रो विशेष

Ginning Industry : सेस प्रकरणी जिनिंग व्यावसायिकांची होणार चौकशी

Director General of Marketing : पणन महासंचालकांमार्फत थेट परवाना मिळविलेल्या जिनींग व्यावसायिकांनी बाजार समितीचा सेस बुडविल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Team Agrowon

Chandrapur News : पणन महासंचालकांमार्फत थेट परवाना मिळविलेल्या जिनींग व्यावसायिकांनी बाजार समितीचा सेस बुडविल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी पणन महासंचालकांकडे राजुरा बाजार समिती उपसभापतींनी तक्रार केल्यानंतर चौकशीचे आदेश देण्यात आले आहे.

दुसरीकडे या व्यावसायिकांनी आपला जिनिंग नसून, धागा तयार करण्याचा प्रक्रिया उद्योग असल्याचा दावा केला आहे. राजूरा बाजार समितीअंतर्गत असलेल्या आठपैकी तीन जिनिंग व्यावसायिकांनी थेट पणन महासंचालकांकडून खरेदी परवाना प्राप्त केला आहे. या जिनिंगमध्ये कापसापासून धागा काढण्यासह इतर प्रक्रिया होतात.

हा व्यवसाय उद्योग श्रेणीत येत असल्याने अशा उद्योगांना बाजार समितीला सेस देणे बंधनकारक नाही. त्यामुळेच आर्वी येथील सालासार व आर्शीवाद या दोन तसेच टेंबुरवाही येथील विजयालक्ष्मी जिनिंगच्या संचालकांनी सेस भरण्यास नकार दिला आहे.

राजुरा बाजार समितीचे उपसभापती संजय पावडे यांनी मात्र या जिनिंगमध्ये कापसापासून धागा काढण्याची किंवा इतर कोणत्याच प्रक्रिया होत नसल्याचे सांगत संबंधितांकडून सेस बुडविण्यासाठी ही पळवाट शोधण्यात आल्याचा आरोप केला आहे. या संबंधाने त्यांनी थेट पणन महासंचालकांकडे तक्रार करीत चौकशीची मागणी केली आहे.

त्याची दखल घेत पणन महासंचालकांनी जिल्हा उपनिबंधकांना तपासणीचे आदेश दिले. जिल्हा उपनिबंधकांनी सहायक निबंधकांची याप्रकरणी चौकशी अधिकारी म्हणून नियुक्‍ती केली आहे.

साहाय्यक निबंधक आता याप्रकरणात चौकशी करून अहवाल साद करणार आहेत. सात दिवसांत हा अहवाल सादर करण्याचे निर्देश असल्याने याप्रकरणी पुढे काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahua Processing Business : गोडवा मोहफुलांच्या लाडवांचा

Beekeeping Business : तरुण उद्योजक मित्रांची अमृत मध निर्मिती

Land Circular: भोगवटादार वर्ग-२ जमिनींसाठी परिपत्रक

Soil and Water Engineering: मृदा, जलसंवर्धनामध्ये अभियांत्रिकी तंत्राचा वापर

Farmer Injustice: शेतकरी नावडे सर्वांना

SCROLL FOR NEXT