Court Decision  Agrowon
ॲग्रो विशेष

Ghatanji APMC : घाटंजी बाजार समितीच्या दोन संचालकांना कोर्टाचा दिलासा

High Court Decision : बाजार समितीच्या संचालक पदावर असताना गैरवर्तन केले म्हणून सदस्यत्व रद्द करण्याच्या बाजार समितीच्या निर्णयाला सहायक निबंधक घाटंजी व जिल्हा उपनिबंधक यवतमाळ यांनी कायम ठेवले होते.

Team Agrowon

Yavtamal News : घाटंजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अभिषेक ठाकरे व आशिष लोणकर यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा बाजार समितीचा ठराव उच्च न्यायालयाने रद्द केला.

बाजार समितीच्या संचालक पदावर असताना गैरवर्तन केले म्हणून सदस्यत्व रद्द करण्याच्या बाजार समितीच्या निर्णयाला सहायक निबंधक घाटंजी व जिल्हा उपनिबंधक यवतमाळ यांनी कायम ठेवले होते.

या निर्णयाविरुद्ध संचालक अभिषेक ठाकरे व आशिष लोणकर यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. १८ डिसेंबर २०२३ रोजी शेतकऱ्यांनी कापूस यार्डमध्ये विक्रीस आणलेला कापूस हमीभावापेक्षा कमी दरात खरेदी करत असल्याच्या कारणावरून माजी सभापती व संचालक अभिषेक ठाकरे तसेच आशिष लोणकर यांनी रास्ता रोको आंदोलन केले होते.

त्यानंतर व्यापाऱ्यांनी कापसाचा लिलाव बंद केला होता. आंदोलनाची दखल घेऊन तहसीलदारांनी व्यापाऱ्यांविरोधात कारवाईचे निर्देश दिले होते. मात्र बाजार समिती सचिवांनी सदर संचालकांची तक्रार सभापतींकडे केली.

त्यानंतर बाजार समितीने कारणे दाखवा नोटीस बजावून सदस्यत्व रद्द करण्याचा ठराव घेतला होता. या संचालकांनी गैरवर्तन केल्याचा कोणताही पुरावा बाजार समिती व सहकार प्रशासनाला देता आला नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Milk Adulteration Racket: गोरखधंदा भेसळीचा!

Maharashtra Vanshree Award 2024: ‘छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार’ जाहीर

Early Banana Harvesting: आगाप कांदेबाग केळीची काढणी खानदेशात सुरू

Pandharpur ST Buses: आषाढी यात्रेसाठी एसटीच्या ५,५०० विशेष बसगाड्या

Coco Peat GST: बियाण्यांप्रमाणे कोकोपीटही जीएसटीमुक्त करण्यात यावे; राज्य भाजीपाला नर्सरी असोसिएशन

SCROLL FOR NEXT