Cotton Cultivation News Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Cultivation : अति घन लागवड करून कापसाचे उच्चांक उत्पादन घ्या

अति घन लागवड करून कापसाचे उच्चांकी उत्पादन घेण्याचा सल्ला ज्येष्ठ कापूस संशोधक डॉ. एस. एस. माने यांनी दिला.

Team Agrowon

Jalna Agriculture News : अति घन लागवड करून कापसाचे उच्चांकी उत्पादन (Cotton Production) घेण्याचा सल्ला ज्येष्ठ कापूस संशोधक डॉ. एस. एस. माने यांनी दिला.

ॲग्रो इंडिया गट शेती संघाचा २१९ द्वादश मेळावा अकोला देव, तालुका जाफराबाद जिल्हा जालना येथे उत्साहात पार पडला. या वेळी कापूस संशोधक डॉ. माने बोलत होते. डॉ. माने म्हणाले, की कापूस हा जूनच्या पहिल्या आठवड्यातच लागवड झाला पाहिजे.

कापूस लागवडीचा अंतर हे चार बाय एक किंवा चार बाय पाऊण फुटावरच करावे. प्लॅस्टिक मल्चिंग म्हणजे अच्छादन हे तण वाढीवर नियंत्रण त्याचबरोबर झाडाच्या मुळाचे तापमान नियंत्रित करीत असल्याने अत्यंत महत्त्वाचे ठरते.

या वेळी त्यांनी कापूस डिव्हलिंग म्हणजे लागवड या यंत्राचे महत्त्व तसेच वापरावयाच्या पद्धतीबद्दल प्रात्यक्षिक करून दाखविले.

या वेळी फळबाग तज्ज्ञ तथा गट शेती प्रणेते डॉ. भगवानराव कापसे यांनी नुकताच धाराशिव, सोलापूर सांगली कोल्हापूर आणि कोकणातील बऱ्याच ठिकाणी आंबा लागवडी बाबत केलेल्या दौऱ्याच्या माध्यमातून घेतलेले कार्यक्रम व पाहिलेल्या बागा विषयी माहिती दिली.

शेतकऱ्यांनी उत्तर दक्षिण अति घन लागवड पद्धतीने कलम अधिक कोइची लागवड करावी. कोई उगवल्यानंतर सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये कोइ कलमाना जोडून द्यावीत, जेणेकरून इन्सितू पद्धतीचा फायदा होऊन फळबाग तिसऱ्याच वर्षी अडीच ते तीन टन उत्पादन सहज देते असे सांगितले.

जास्त चोपन जमीन असली तर त्यात ५० टक्के मुरूम टाकावा आणि अतिशय हलकी जमीन असल्यास त्यात ५० टक्के गाळ टाकावा.

कार्यक्रमाचे संचलन भाऊराव आटपळे यांनी केले तर आभार प्रदर्शन लक्ष्मण सवडे यांनी केले. कार्यक्रमास भाऊराव दरेकर, तुळशीराम गाढवे, संतोष बोर्डे इत्यादी मंडळी उपस्थित होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT