Generic Medicine Agrowon
ॲग्रो विशेष

Generic Medicine : जेनेरिक औषधांच्या दुकानांचे कंत्राट एकाच कंपनीला

Maharashtra Government : राज्यातील सर्व सरकारी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांमध्ये जेनेरिक औषधांची दुकाने सुरू करण्याचे कंत्राट एकाच कंपनीला देण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला. त्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले.

Team Agrowon

Medical College : राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांमध्ये जेनेरिक औषधांची दुकाने सुरू करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले.

कुठलीही निविदा प्रक्रिया न राबविता एकाच संस्थेला ही दुकाने सुरू करण्याची परवानगी दिली असल्याचा दावा याचिकेत केला आहे. एचबीपी महाजन चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेने ही याचिका दाखल केली.

न्यायमूर्ती अतुल चांदूरकर आणि न्यायमूर्ती वृषाली जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. याचिकेनुसार, राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने ११ जुलै २०२३ रोजी एक शासन निर्णय जारी करून न्याकोप इंडिया लि.

या संस्थेला राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांमध्ये जेनेरिक औषधी विक्री केंद्र सुरू करण्याची परवानगी दिली. हा शासन निर्णय जारी करण्यापूर्वी कोणत्याही कायदेशीर बाबींची पूर्तता करण्यात आलेली नाही. यासाठी जाहिरात दिली गेली नाही, निविदा बोलविण्यात आलेली नाही.

सरकारने निविदा मागविली असती तर यात इतरही संस्थांना सहभाग घेता आला असता. एकाच संस्थेला जेनेरिक औषधी विक्री केंद्र सुरू करण्याची परवानगी देणे कायद्याविरुद्ध आहे. त्यामुळे ही परवानगी रद्द करण्यात यावी, अशी मागणी याचिकेत आहे.

न्यायालयाने राज्य शासन व न्याकोप कंपनीला नोटीस बजावत शपथपत्र दाखल करण्याचे आदेश दिले. तसेच या शासन निर्णयाची कार्यवाही न्यायालयाच्या आदेशाच्या अधीन राहील, असेही न्यायालयाने आदेशात स्पष्ट केले. याचिकाकर्त्यातर्फे ॲड. अनिल ढवस यांनी बाजू मांडली. त्यांना ॲड. कौस्तुभ भिसे यांनी सहकार्य केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Loan: शेतकऱ्यानं जीवन संपवल्यास बँका जबाबदार- महसूलमंत्री बावनकुळे

Sita Herbal Farm: अल्पभूधारक महिलांच्या ‘सीता हर्बल फार्म’ची वनौषधी उद्योगापर्यंत झेप

Crop Insurance Compensation: शेतकऱ्यांचे डोळे पीक विमा भरपाईकडे

Agricultural Cost Inflation: येत्या वर्षातही वाढणार शेतीवरील खर्च, खाद्य महागाई

Horoscope 5 October 2026 : कठीण परिस्थितीचा धैर्याने सामना कराल

SCROLL FOR NEXT