Mahabeej Agrowon
ॲग्रो विशेष

Mahabeej : ‘महाबीज’ची आज सर्वसाधारण सभा

Latest Agriculture News : महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाची सर्वसाधारण सभा आज, शनिवारी (ता.१६) येथे आयोजित करण्यात आली आहे.

Team Agrowon

Buldana News : महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाची सर्वसाधारण सभा आज, शनिवारी (ता.१६) येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला राज्याचे कृषी खात्याचे सचिव अनुपकुमार, कृषी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

महाबीजच्या सर्वसाधारण सभेत राज्यभरातील भागधारक, बीजोत्पादक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. या वर्षीही सभेला मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. मागील वर्षी उगवण क्षमतेच्या विषयावर भागधारकांनी मोठ्या प्रमाणात आवाज उठवला होता.

महाबीज बीजोत्पादकांनी उत्पादित केलेले बियाणे चाचणीत नापास होण्याचे प्रमाण प्रचंड वाढल्याने नाराजीचा सूरही तेव्हा उमटला. यामुळे दुसऱ्या प्रयोगशाळेची, बियाणे उगवण क्षमतेच्या पुनर्चाचणीची मागणी काही भागधारकांनी लावून धरली होती. यानंतर आता पुनर्चाचणीमध्ये बियाणे किती प्रमाणात पास झाले होते, याची माहिती आज, शनिवारच्या सभेत विचारला जाण्याचीही शक्यता काही भागधारकांनी बोलून दाखवली.

बियाण्याची ग्रेडिंग करताना दोन ते तीन टक्के प्रोसेसिंग लॉस दाखवला जातो. याचा शेतकऱ्यांशी काय संबंध आहे, असा प्रश्‍न एका भागधारकाने उपस्थित करणार असल्याचे सांगितले. गुडसीड व लोग्रेड यात तफावतीचे प्रमाण असून ते शेतकऱ्यांसाठी मारक असल्याची भावना बीजोत्पादकांमध्ये आहे.

कर्मचारी भरतीचा विषय चर्चेत राहण्याची शक्यता आहे. जे कर्मचारी डेलीवेजेवर काम करीत आहेत, त्यांना पूर्णवेळ केले पाहिजे. चांगले काम करणाऱ्यांना भरती करायला हवी, असेही बोलले जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

Crop Insurance Scheme: नांदेडमध्ये पीकविमा योजनेत ९ लाखांहून अधिक अर्ज

Irrigation Projects : रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना गती

Farm Loan Waiver: कर्जमाफी रक्कम वितरणास विलंब का? सहकारमंत्र्यांनी सांगितलं कारण

Mechanized Paddy Transplantation: यंत्राने भात लागवडीकडे वाढता कल

SCROLL FOR NEXT