MP Rajendra Gavit Agrowon
ॲग्रो विशेष

Mumbai-Ahmedabad Highway : महामार्गासाठी गावित आक्रमक

MP Rajendra Gavit : मुंबई-अहमदाबाद महामार्गाच्या दुरवस्थेबाबत पालघरचे माजी खासदार राजेंद्र गावित आता आक्रमक झाले आहेत.

Team Agrowon

Mumbai News : मुंबई-अहमदाबाद महामार्गाच्या दुरवस्थेबाबत पालघरचे माजी खासदार राजेंद्र गावित आता आक्रमक झाले आहेत. रस्त्यांची चाळण झाल्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अभियंत्यांची गावितांनी कानउघाडणी केली.

राज्यपाल रमेश बैस यांच्या पालघर जिल्हा दौऱ्यानिमित्त जिल्हाधिकारी, महापालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत त्यांनी पाहणी केली. या पाहणी दौऱ्यात पालघरचे माजी खासदार राजेंद्र गावित यांनी रस्त्यांच्या दुरवस्थेबद्दल अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली.

महामार्गाच्या व्हाईट टॅपिंगच्या कामाला पावसाळ्याच्या सुरुवातीलाच सुरुवात झाली होती. त्यामुळे व्हाईट टॅपिंगचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याने आंदोलनही केले होते. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी महामार्गाची पाहणी केली होती. त्या वेळी माजी खासदार गावित यांनी त्याबाबत चर्चा केली.

या वेळी वसई विरार महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. महामार्गाची दुरवस्था झाल्याने राजेंद्र गावित यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह संबंधित अधिकाऱ्यांनाही सुनावले आहे. या वेळी पालिकेच्या अधिकाऱ्यांनाही त्यांनी विकासाच्या मुद्यावरून धारेवर धरले.

राज्यपालांचा महामार्गावरून प्रवास

बहुचर्चित मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून राज्यपाल रमेश बैस पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील गालतरे येथील ईको व्हिलेज येथे कार्यक्रमासाठी आले होते. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जिल्हाधिकाऱ्यांनी या महामार्गाची पाहणी केली होती.

वाहतूक कोंडी

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून राज्यपालांचा प्रवास सुखरूप होण्यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता, सोबत महामार्गावर सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात आल्या होत्या. दिवसभर महामार्ग वाहतूक कोंडीमुक्त होता.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Red Sandalwood: लाल चंदन प्रकरणावर सहा महिन्यांत निर्णय घ्या

Farmer Support: टंचाईत शेतकऱ्यांना अडचणी भासू देऊ नयेत : पालकमंत्री बोर्डीकर

Farmer Support: गंभीर परिस्थितीत शासन खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी : कृषिमंत्री भरणे

Drought Declaration Demands: प्रत्यक्ष नुकसानीच्या आधारे दुष्काळ जाहीर करा : झनक

Multi State Cooperative Society: एन साई मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीला ७ कोटी ९ लाखांचा नफा : ठोंबरे

SCROLL FOR NEXT