Edible Oil Rate agrowon
ॲग्रो विशेष

Edible Oil Rate : लसूण चारशे रुपये किलो; खाद्यतेलाच्या दरात वाढ, लसूण पिकावर वातावरणाचा परिणाम

Garlic Rate : मध्य प्रदेश, राजस्थान राज्यात ६८ टक्के लसूणाचे पीक घेतले जाते. मे महिन्यात या परिसरात उन्हाचा प्रचंड तडाखा बसला. त्यात लसूण पिकाचे मोठे नुकसान झाले.

sandeep Shirguppe

Kolhapur Vegetables Rate : ऐन दिवाळीत लसूण चारशे रूपये किलो झाल्याने लसूण उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दर मिळत आहे. तर एका महिन्यात १४० रूपये लसणाची भाववाढ झाली आहे. याबरोबर केंद्र शासनाकडून अबकरी दरात वाढ केल्याने खाद्यतेलाचे दर २० ते २५ रुपयांनी वाढले आहेत. तसेच पावसाने शेतात पाणी साचून राहिल्याने पालेभाज्यांच्या उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे बाजारात आवक कमी होत आहे.

मेथी, पोकळा, कांदापातचे प्रतिपेंडी दर तीस रुपये असे आहेत. वांगी, कोबी, भेंडी, टोमॅटो, कारली, हिरवी मिरची, ढब्बू मिरची, काकडी, दोडक्याचे दरही ६० ते ८० रुपये प्रतिकिलो असे, तर बाराही महिने दराचा उच्चांकावर असणारी गवारीचा प्रतिकिलोचा दर १२० ते १२५ इतका आहे.

मध्य प्रदेश, राजस्थान राज्यात ६८ टक्के लसूणाचे पीक घेतले जाते. मे महिन्यात या परिसरात उन्हाचा प्रचंड तडाखा बसला. त्यात लसूण पिकाचे मोठे नुकसान झाले. त्याचा थेट परिणाम लसूण दरवाढीवर झाला आहे.

भारतात सुमारे ३० लाख टनाहून अधिक उत्पादन होते. उत्पादन क्षेत्रात मे महिन्यात तीव्र उन्हाळ्यामुळे साठवून ठेवलेला लसून खराब झाला. त्यामुळे मागील काही महिन्यांत दरात सातत्याने वाढ होऊ लागली असल्याचे मत लसूण व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.

फळभाज्यांचे किलोचे दर रूपयात

कोबी १५ ते २५ नग, फ्लॉवर गड्डा २० ते ३०, वांगी ४० ते ६०, हिरवी मिरची ६० ते ७०, कारली ४० ते ५०, ढब्बू मिरची ६० ते ८०, गवार १२० ते १२५, भेंडी ४० ते ६०, दोडका ४० ते ६०, बिनीस ८० ते १००, काकडी ४० ते ५०, दुधी भोपळा २०, गाजर ४० ते ६०, दोडका ६० ते ८०, काकडी ५० ते ६०, भेंडी ६०, दुधीभोपळा १० ते २०, गाजर ४० ते ५०, भुईमुगाच्या शेंगा ८०, रताळी ४० ते ५०, कांदा ४०, बटाटा ४०, बटाटा (इंदोरी) ४५ ते ५०, मका कणीस ५ ते ७, मका कणीस (स्वीट कॉर्न) ९ ते १५ रुपये प्रतिनग मुळा प्रतिनग १० रुपये.

पालेभाज्यांचे पेंडीचे दर रूपयात

पालक १० ते १५, मेथी ३०, शेपू २५, कोथिंबीर २० ते ३०, अंबाडा १० ते १५.

फळांचे किलोचे दर

सफरचंद (इंडियन) ८० ते १२०, सीताफळ ४० ते ६०, पेरू ५० ते ६०, ड्रॅगनफ्रूट १२० ते १६०, डाळिंब १०० ते १६०, खाद्यतेलाचे किलोचे दर २० ते २५ रुपयांनी वाढले

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orchard Water Management: पाण्याच्या उपलब्धतेनुसार अतिघन बागेचे नियोजन

Soybean Crop Management: सोयाबीनमधील फुलगळीची कारणे जाणून उपाययोजना आवश्‍यक

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

SCROLL FOR NEXT