Soyabean Crop Agrowon
ॲग्रो विशेष

Soyabean Crop : विराहित परिसरात बुरशीजन्य रोगांचा सोयाबीनला तडाखा

Kharif Season : अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील विराहित परिसरात सोयाबीन पिकावर बुरशीजन्य रोग, मूळकुजचा प्रादुर्भाव झाला आहे.

Team Agrowon

Akola News : अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील विराहित परिसरात सोयाबीन पिकावर बुरशीजन्य रोग, मूळकुजचा प्रादुर्भाव झाला आहे. शेकडो एकरांतील पिके वेळेआधी पिवळे पडून शेंगा पूर्ण गळाल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शासकीय मदतीची शेतकरी मागणी करीत आहेत.

विराहित शिवारात सोयाबीनची लागवड शेतकऱ्यांनी केली होती. मध्यंतरी पावसात खंड पडल्याने पिकाची व आहे. हजार रुपये खर्च करून फवारणी केली असता कोणताही फरक शेतकऱ्याला जाणवला नाही. या विषाणूंमुळे हातातील सोयाबीन पीक गेल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

तरीही शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी व कृषी सहायकांचे कोणतेच मार्गदर्शन मिळाले नाही. या परिसरातील शेतकऱ्यांनी कृषी विभागाला तक्रार करूनही कोणताही अधिकारी शेत शिवारात फिरकला नाही. दरदिवसाला या पिकाची परिस्थिती बदलत चालली आहे.

माझे पूर्ण शेत या विषाणूंमुळे पिवळे पडले. शेंगांची गळती झाली. कृषी विभागाला याची माहिती दिली. मात्र कोणताही अधिकारी शेतापर्यंत आलेला नाही. या रोगामुळे संपूर्ण परिसरातील शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे.
- ज्ञानेश्‍वर कट्यारमल, विराहीत

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Rate In Maharashtra : कांदा निर्यात धोरणामुळेच दर घसरले असे म्हणता येणार नाही; लोकसभेत केंद्र सरकारचे स्पष्टीकरण

Opposition MPs Protest: विरोधी खासदारांची काळे कपडे घालून संसद परिसरात निदर्शने, लोकसभा, राज्यसभेचे कामकाज तहकूब

El Nino Update : एल निनो मार्च २०२७ पर्यंत टिकण्याची ९७ टक्के शक्यता; अमेरिकेच्या हवामान संस्थेचा अंदाज

Rainwater Harvesting: पर्जन्यजल संधारण : महत्त्व, नियोजन अन् प्रभावी व्यवस्थापन

Smart Mango Farming: ९० एकरांतील व्यवस्थापन तंत्रज्ञानामुळे झाले सुलभ

SCROLL FOR NEXT