Kolhapur News : जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी सौर ऊर्जा प्रकल्प व संरक्षक भिंती बांधण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून निधी देण्यात येईल, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षणमंत्री आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
राजर्षि छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जिल्ह्यातील शाळांनी शैक्षणिक गुणवत्ता वाढवून राज्यात अग्रेसर बनावे, असे आवाहन त्यांनी या वेळी केले.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान २०२३-२४’च्या जिल्हास्तरीय पुरस्कारांचे वितरण श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.
या वेळी आमदार जयंत आसगावकर, जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई, माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर, जलजीवन मिशनच्या प्रकल्प संचालक माधुरी परीट, सर्जेराव पाटील आदी उपस्थित होते.
या वेळी मान्यवरांच्या हस्ते ‘माझी शाळा’ अभियानात जिल्हा व तालुका स्तरावरील विजेत्या शाळांना पारितोषिक तसेच जलजीवन मिशनअंतर्गत स्पर्धांच्या बक्षिसांचे वितरण मुश्रीफ यांच्या हस्ते झाले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.