Crop Damage  Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage Compensation : अवकाळीच्या नुकसानीपोटी २८.७२ कोटींचा निधी मंजूर

Unseasonal Rain Crop Loss : फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे महिन्यात अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात शेतीपिकांचे नुकसान झाले होते. नुकसानभरपाईपोटी शासनाने २८ कोटी ७२ लाख ३६ हजार रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे.

Team Agrowon

Nanded News : जिल्ह्यात फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे महिन्यात अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात शेतीपिकांचे नुकसान झाले होते. नुकसानभरपाईपोटी शासनाने २८ कोटी ७२ लाख ३६ हजार रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. याप्रकरणी बाधित शेतकऱ्यांच्या याद्या डीबीटी पोर्टलवर अपलोड करण्याचे संबंधित तहसीलदारांना निर्देश देण्यात आले आहेत.

उन्हाळ्याच्या प्रारंभी दरवर्षीच नांदेड जिल्ह्याला अवकाळी पावसाचा तडाखा बसतो. अनेकवेळा गारपीटही होते. परंतु ती साधारण एप्रिल ते मे महिन्यात होते. परंतु यंदा फेब्रुवारी, मार्चचा पहिला पंधरवडा उलटत नाही तोच अवकाळीने तडाखा दिला आहे. माभोकर मतदारसंघात अवकाळीने अक्षरशः हैदोस घातला होता.

यासंबंधी प्रशासनाकडून पंचनामे करण्यात येऊन शासनाकडे मदतीसाठी प्रस्ताव पाठविण्यात आला होता. यात फेब्रुवारीत २० हजार ७०० शेतकऱ्यांचे ११ हजार ९११ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते.

यासाठी २० कोटी ६२ लाख ७३ हजार ८०० रुपये, मार्चमध्ये २ हजार ९०० शेतकऱ्यांचे एक हजार २४७ हेक्टर क्षेत्रावरील नुकसानीपोटी २ कोटी ८२ लाख १६ हजार रुपये, एप्रिलमध्ये १ हजार ७३३ शेतकऱ्यांचे एक हजार ६४ हेक्टर क्षेत्रावरील नुकसानीपोटी दोन कोटी ८८ लाख ३७ हजार ८१६ व मे महिन्यात ९२३ शेतकऱ्यांचे ७४५ हेक्टर क्षेत्र बाध‍ित झाले आहे. त्यासाठी दोन कोटी ३९ लाख ९ हजार रुपये, असे एकूण २८ कोटी ७२ हजार ३६ हजार ६१६ रुपये निधीला मंजूरी मिळाली आहे.

तालुकानिहाय मंजूर निधी

मुखेड एक कोटी ९० लाख ४५ हजार २००, धर्माबाद एक कोटी २८ लाख ९४ हजार, उमरी १४ कोटी १५ लाख ३० हजार, भोकर २५ लाख १६ हजार, नांदेड १९ लाख ८४ हजार (एप्रिल), ३ लाख ३ हजार ८४० (मे), अर्धापूर ३६ हजार ७६० (मार्च), २ कोटी १४ लाख २९ हजार (एप्रिल), दोन कोटी २१ लाख ४८ हजार ६०० (मे) , लोहा चार लाख २१ हजार २०० (एप्रिल), ९ लाख ५९ हजार ७६० (मे), बिलोली ४३ हजार २०० (मे), भोकर २५ लाख १६ हजार (फेब्रुवारी), ८७ हजार ४८०(मे), किनवट २ कोटी २१ लाख ९३ हजार ६४० (मार्च), १४ लाख ४० हजार (एप्रिल), ३ कोटी २४ हजार (मे), माहूर २८ लाख ८५ हजार (एप्रिल), मुदखेड ५ लाख ४० हजार (एप्रिल), नायगाव २९ लाख ३७ हजार (मार्च) व देगलूर ३० लाख ४८ हजार (मार्च).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT