Fruit Orchard Insurance Update : मृग बहर-२०२३ मध्ये द्राक्ष फळपिकासाठी ही योजना अधिसूचित जिल्हा व अधिसूचित तालुक्यातील, अधिसूचित महसूल मंडळात राबविण्यात येते.
सदर योजना कार्यान्वित करणारी विमा कंपनी शासनाच्या महावेद प्रकल्प अंतर्गत स्थापन केलेल्या हवामान केंद्र येथे नोंदवल्या गेलेल्या हवामानाच्या तपशिलानुसार विमा योजनेत भाग घेतलेल्या शेतकऱ्यांना परस्पर नुकसान भरपाई देईल.
द्राक्ष पिकास निवडलेल्या विमा कंपनीमार्फत खाली नमूद केलेल्या विमा संरक्षण कालावधीत निवडक हवामान धोक्यामुळे होणाऱ्या संभाव्य पीक नुकसानीस (आर्थिक) विमा संरक्षण प्रदान होईल. द्राक्ष बाग वय वर्ष २ पूर्ण झालेल्या उत्पादनक्षम बागेस विमा संरक्षण राहील.
द्राक्ष पिकासाठी पाऊस, आर्द्रता व किमान तापमान या हवामान घटकांपासून होणाऱ्या नुकसानीपासून विमा संरक्षण देण्यात आले आहे.
विमा संरक्षण कालावधी---प्रमाणके (ट्रीगर) व नुकसान भरपाई रक्कम (रुपये प्रति हेक्टर)
१५ जून ते १० जुलै---या कालावधीत सलग ३ दिवस प्रतिदिन १० मि.मी. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास, आर्द्रता ७० टक्के किंवा जास्त असल्यास तसेच किमान तापमान १० अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास रु. २५,६००.
००---या कालावधीत सलग ४ दिवस प्रतिदिन १० मि.मी. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास, आर्द्रता ७० टक्के किंवा जास्त असल्यास तसेच किमान तापमान १० अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास रु. ६४,०००.
११ जुलै ते ३० ऑगस्ट---या कालावधीत सलग ४ दिवस प्रतिदिन १० मि.मी. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास, आर्द्रता ६० टक्के किंवा जास्त असल्यास, तसेच किमान तापमान १० अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास रु. ३८,४००.
००---या कालावधीत सलग ५ दिवस प्रतिदिन १० मि.मी. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास, आर्द्रता ६० टक्के किंवा जास्त असल्यास तसेच किमान तापमान १० अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास रु. ९६,०००.
१ सप्टेंबर ते १५ नोव्हेंबर---या कालावधीत सलग ३ दिवस प्रतिदिन १० मि.मी. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास, आर्द्रता ६० टक्के किंवा जास्त असल्यास तसेच किमान तापमान १० अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास रु. ६४,०००.
००---या कालावधीत सलग ४ दिवस प्रतिदिन १० मि.मी. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास, आर्द्रता ६० टक्के किंवा जास्त असल्यास तसेच किमान तापमान १० अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास रु. १,६०,०००.
विमा संरक्षण रक्कम ः ३,२०,००० रुपये प्रति हेक्टर.
- शेतकऱ्यांसाठी विमा हप्ता रु. १६,००० ते ६४,००० प्रति हेक्टर. शेतकऱ्यांसाठी विमा हप्ता हा सर्वसाधारणपणे विमा संरक्षित रकमेच्या ५ टक्के च्या मर्यादेत असतो. मात्र, एकूण वास्तवदर्शी विमा हप्ता ३५ टक्के हून अधिक असल्यास त्या अधिक विमा हप्त्यातील ५० टक्के भार शेतकऱ्यांना उचलावा लागतो. विमा हप्ता दर जिल्हानिहाय वेगवेगळे असू शकतात. त्यामुळे शेतकऱ्याने भरवायच्या विमा हप्त्यात जिल्हानिहाय फरक असू शकतो.
- या योजनेत अधिसूचित क्षेत्रात, अधिसूचित फळपिकासाठी कुळाने, भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसहित इतर सर्व शेतकरी भाग घेऊ शकतात.
- पीककर्ज घेणाऱ्या आणि बिगर कर्जदारांसाठी योजनेतील सहभाग ऐच्छिक राहणार आहे.
- बिगर कर्जदार शेतकरी विहित मुदतीत बँकेने किंवा ऑनलाइन फळपीक विमा पोर्टल www.pmfby.gov.in वर विमा हप्ता जमा करून सहभाग घेऊ शकतात. त्यासाठी आधार कार्ड, जमीन धारणा सातबारा, ८ (अ) उतारा व पीक लागवड स्वयंघोषणा पत्र, फळबागेचा (Geo Tagging) केलेला फोटो, बँक पासबुकवरील बँक खातेबाबत सविस्तर माहिती लागेल. कॉमन सर्विस सेंटरमार्फत अर्ज ऑनलाइन भरता येतील.
विमा योजनेत समाविष्ट जिल्हे आणि संबंधित कंपनी
जिल्हे---विमा कंपनीचे नाव व पत्ता
नाशिक---रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लि.
सांगली---एचडीएफसी एर्गो जनरल इन्शुरन्स कं. लि.
पुणे---भारतीय कृषी विमा कंपनी लिमिटेड
- सहभागी होण्याची अंतिम दिनांक ः १४ जून २०२३.
- अधिसूचित फळपिकांपैकी एका फळपिकासाठी एका वर्षात एकाच क्षेत्रावर मृग अथवा आंबिया बहर यापैकी कोणत्याही एकाच हंगामासाठी विमा संरक्षण अर्ज करता येईल.
- एक शेतकरी ४ हेक्टरच्या मर्यादेत विमा संरक्षण घेऊ शकतो.
- शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन हप्ता भरण्यासाठी विमा पोर्टल www.pmfby.gov.in
अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी आपल्या संबंधित विमा कंपनी, तालुका कृषी अधिकारी कार्यालयासाठी संपर्क साधावा.
लिंबू फळपिकासाठी विमा योजना
मृग बहर-२०२३ मध्ये लिंबू फळपिकासाठी ही योजना अधिसूचित जिल्हा व अधिसूचित तालुक्यातील, अधिसूचित महसूल मंडळात राबविण्यात येते.
सदर योजना कार्यान्वित करणारी विमा कंपनी शासनाच्या महावेद प्रकल्प अंतर्गत स्थापन केलेल्या हवामान केंद्र येथे नोंदविल्या गेलेल्या हवामानाच्या तपशिलानुसार विमा योजनेत भाग घेतलेल्या शेतकऱ्यांना परस्पर नुकसान भरपाई देईल.
लिंबू फळपिकास निवडलेल्या विमा कंपनीमार्फत नमूद केलेल्या विमा संरक्षण कालावधीत निवडक हवामान धोक्यामुळे होणाऱ्या संभाव्य पीक नुकसानीस (आर्थिक) विमा संरक्षण प्रदान होईल. वय वर्षे ४ पूर्ण झालेल्या उत्पादनक्षम लिंबू बागेस विमा संरक्षण राहील.
विमा संरक्षण प्रकार (हवामान धोके)---विमा संरक्षण कालावधी---प्रमाणके (ट्रीगर) व नुकसान भरपाई रक्कम (रुपये प्रति हेक्टर)
कमी पाऊस---१५ जून ते १५ जुलै---या कालावधीत एकूण १०० मि.मी. ते १५० मि.मी. या दरम्यान पाऊस झाल्यास रु. १७,५००.
००---या कालावधीत एकूण १०० मि.मी. पेक्षा कमी पाऊस झाल्यास रु. ३५,०००.
पावसाचा खंड व जास्त तापमान---१६ जुलै ते १५ ऑगस्ट---या कालावधीत सलग १५ ते २१ दिवस पावसांत खंड पडून दिवसाचे जास्तीत जास्त तापमान कोणत्याही दिवशी ३५ अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्त राहिल्यास रु. १७,५००.
००---या कालावधीत सलग २१ दिवसांपेक्षा जास्त दिवस पावसाचा खंड पडल्यास आणि दिवसाचे जास्तीत जास्त तापमान सलग ३ दिवस ३५ अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्त राहिल्यास रु. ३५,०००.
००---(२.५ मि.मी. पर्यंत किंवा त्यापेक्षा कमी पाऊस पडला तरी तो खंड समजण्यात येईल)
विमा संरक्षण रक्कम ः रुपये ७०,००० प्रति हेक्टर.
- शेतकऱ्यांसाठी विमा हप्ता रु. ३५०० ते १२,२५० प्रति हेक्टर. शेतकऱ्यांसाठी विमा हप्ता हा सर्वसाधारणपणे विमा संरक्षित रकमेच्या ५ टक्केच्या मर्यादेत असतो. मात्र, एकूण वास्तवदर्शी विमा हप्ता ३५ टक्के हून अधिक असल्यास त्या अधिक विमा हप्त्यातील ५० टक्के भार शेतकऱ्यांना उचलावा लागतो. विमा हप्ता दर जिल्हानिहाय वेगवेगळे असू शकतात. त्यामुळे शेतकऱ्याने भरावयाच्या विमा हप्त्यात जिल्हानिहाय फरक असू शकतो.
- या योजनेत अधिसूचित क्षेत्रात, अधिसूचित फळपिकासाठी कुळाने, भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसहित इतर सर्व शेतकरी भाग घेऊ शकतात.
- पीककर्ज घेणाऱ्या आणि बिगर कर्जदारांसाठी योजनेतील सहभाग ऐच्छिक राहणार आहे.
- बिगर कर्जदार शेतकरी विहित मुदतीत बँकेने किंवा ऑनलाइन फळपीक विमा पोर्टल www.pmfby.gov.in वर विमा हप्ता जमा करून सहभाग घेऊ शकतात. त्यासाठी आधार कार्ड, जमीन धारणा सातबारा, ८ (अ) उतारा व पीक लागवड स्वयंघोषणा पत्र, फळबागेचा (Geo Tagging) केलेला फोटो, बँक पासबुकवरील बँक खातेबाबत सविस्तर माहिती लागेल. कॉमन सर्विस सेंटरमार्फत अर्ज ऑनलाइन भरता येतील.
विमा योजनेत समाविष्ट जिल्हे आणि संबंधित कंपनी
जिल्हे---विमा कंपनीचे नाव व पत्ता
नगर, अमरावती, नाशिक, वाशीम, धुळे, सोलापूर---रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लि.
बीड, छत्रपती संभाजीनगर, अकोला, सांगली, वर्धा, परभणी, जालना, लातूर---एचडीएफसी एर्गो जनरल इन्शुरन्स कं. लि.
बुलडाणा, जळगाव, नांदेड, पुणे, धाराशिव---भारतीय कृषी विमा कंपनी लिमिटेड.
अधिसूचित फळपिकांपैकी एका फळपिकासाठी एका वर्षात एकाच क्षेत्रावर मृग अथवा आंबिया बहर यापैकी कोणत्याही एकाच हंगामासाठी विमा संरक्षण अर्ज करता येईल.
- एक शेतकरी ४ हेक्टरच्या मर्यादेत विमा संरक्षण घेऊ शकतो.
- शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन हप्ता भरण्यासाठी विमा पोर्टल www.pmfby.gov.in
सहभागी होण्यासाठी अंतिम दिनांक ः १४ जून २०२३.
अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी आपल्या संबंधित विमा कंपनी, तालुका कृषी अधिकारी कार्यालयासाठी संपर्क साधावा.
संत्रा फळपिकासाठी विमा योजना
मृग बहर-२०२३ मध्ये संत्रा पिकासाठी ही योजना अधिसूचित जिल्हा व अधिसूचित तालुक्यातील, अधिसूचित महसूल मंडळात राबविण्यात येते.
सदर योजना कार्यान्वित करणारी विमा कंपनी शासनाच्या महावेद प्रकल्प अंतर्गत स्थापन केलेल्या हवामान केंद्र येथे नोंदविल्या गेलेल्या हवामानाच्या तपशिलानुसार विमा योजनेत सहभागी शेतकऱ्यांना परस्पर नुकसान भरपाई देईल.
संत्रा पिकास निवडलेल्या विमा कंपनीमार्फत खाली नमूद केलेल्या विमा संरक्षण कालावधीत निवडक हवामान धोक्यांमुळे होणाऱ्या संभाव्य पीक नुकसानीस (आर्थिक) विमा संरक्षण प्रदान होईल. संत्रा बाग वय वर्ष ३ पूर्ण झालेल्या उत्पादन क्षम बागेस विमा संरक्षण राहील.
विमा संरक्षण प्रकार (हवामान धोके)---विमा संरक्षण कालावधी---प्रमाणके (ट्रीगर) व नुकसान भरपाई रक्कम (रुपये प्रति हेक्टर)
कमी पाऊस---१५ जून ते १५ जुलै---या कालावधीत एकूण १२४ मि.मी. ते १५० मि.मी. दरम्यान पाऊस झाल्यास रु. १२,०००/-
००---या कालावधीत एकूण १२४ मि.मी.पेक्षा कमी पाऊस झाल्यास रु. ४०००० /-
पावसाचा खंड---१६ जुलै ते १५ ऑगस्ट---या कालावधीत सलग १५ ते २१ दिवस पावसात खंड आणि दिवसाचे कमाल तापमान सलग ३ दिवस ३५ अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्त राहिल्यास रु. १८,०००/-
००---या कालावधीत सलग २१ दिवसांपेक्षा जास्त काळ पावसात खंड पडल्यास आणि दिवसाचे कमाल तापमान सलग ३ दिवस ३५ अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्त राहिल्यास रु. ४०,०००/-
००---(२.५ मि.मी. पर्यंत किंवा त्यापेक्षा कमी पाऊस पडला तरी तो खंड समजण्यात येईल.)
- विमा संरक्षण रक्कम रुपये ८०,००० प्रति हेक्टर
- शेतकऱ्यांसाठी विमा हप्ता रु. ४००० ते ८००० प्रति हेक्टर. शेतकऱ्यांसाठी विमा हप्ता हा सर्वसाधारणपणे विमा संरक्षित रकमेच्या ५ टक्के च्या मर्यादेत असतो. मात्र, एकूण वास्तव दर्शी विमा हप्ता ३५ टक्के हून अधिक असल्यास त्या अधिक विमा हप्त्यातील ५० टक्के भार शेतकऱ्यांना उचलावा लागतो. विमा हप्ता दर जिल्हानिहाय वेगवेगळे असू शकतात. त्यामुळे शेतकऱ्याने भराववाच्या विमा हप्त्यात जिल्हानिहाय फरक असू शकतो.
- या योजनेत अधिसुचित क्षेत्रात, अधिसूचित फळपिकासाठी कुळाने, भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसहित इतर सर्व शेतकरी भाग घेऊ शकतात.
- पीककर्ज घेणाऱ्या आणि बिगर कर्जदारांसाठी योजनेतील सहभाग ऐच्छिक राहणार आहे.
- बिगर कर्जदार शेतकरी विहित मुदतीत बँकेने किंवा ऑनलाइन फळपीक विमा पोर्टल www.pmfby.gov.in वर विमा हप्ता जमा करून सहभाग घेऊ शकतात. त्यासाठी आधार कार्ड, जमीन धारणा सातबारा, ८ (अ) उतारा व पीक लागवड स्वयंघोषणा पत्र, फळबागेचा (Geo Tagging) केलेला फोटो, बँक पासबुकवरील बँक खातेबाबत सविस्तर माहिती लागेल. कॉमन सर्विस सेंटरमार्फत अर्ज ऑनलाइन भरता येतील.
विमा योजनेत समाविष्ट जिल्हे आणि संबंधित कंपनी ः
जिल्हे---विमा कंपनीचे नाव व पत्ता
नगर, अमरावती, वाशिम, यवतमाळ, नागपूर---रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लि.
बीड, अकोला, वर्धा, हिंगोली, परभणी, जालना---एचडीएफसी एर्गो जनरल इन्शुरन्स कं. लि.
बुलडाणा, पुणे---भारतीय कृषी विमा कंपनी लिमिटेड.
- सहभागी होण्याची अंतिम दिनांक ः १४ जून २०२३.
- अधिसूचित फळपिकांपैकी एका फळपिकासाठी एका वर्षात एकाच क्षेत्रावर मृग अथवा आंबिया बहर यापैकी कोणत्याही एकाच हंगामासाठी विमा संरक्षण अर्ज करता येईल.
- एक शेतकरी ४ हेक्टरच्या मर्यादेत विमा संरक्षण घेऊ शकतो.
- शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन हप्ता भरण्यासाठी विमा पोर्टल www.pmfby.gov.in
- शेतकऱ्यांनी उत्पादन योग्य फळपिक नसताना विमा योजनेत सहभाग घेतल्यास त्यांचे विरुद्ध कडक कारवाई होऊ शकते. त्यासाठी ज्या शेतकऱ्यांकडे उत्पादन योग्य वयाची फळबाग आहे, त्यांनीच योजनेत सहभाग घ्यावा.
अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी आपल्या संबंधित विमा कंपनी, तालुका कृषी अधिकारी कार्यालयासाठी संपर्क साधावा.
संपर्क - विनयकुमार आवटे, (कृषी सहसंचालक, कृषी आयुक्तालय, पुणे)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.