Farmer Issue Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer Demands : संग्रामपूरला फळपीक विमा, गारपिटीची मदत द्यावी

Crop Insurance and Hail Help Demand : संग्रामपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना संत्रा पिकाचा आंबिया बहार फळ पीकविमा व फेब्रुवारीत झालेल्या गारपीट नुकसानाची मदत लवकर द्यावी.

Team Agrowon

Buldhana News : ‘‘संग्रामपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना संत्रा पिकाचा आंबिया बहार फळ पीकविमा व फेब्रुवारीत झालेल्या गारपीट नुकसानाची मदत लवकर द्यावी, अशी मागणी तालुक्यातील सोनाळा, बावनबीर येथील शेतकऱ्यांनी पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे केली आहे.

यावर्षी फेब्रुवारी महिन्यात अचानक वादळवारा व पाऊस आला होता. तसेच गारपीटही झाली होती. त्यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या शेतात ज्वारी, गहू, हरभरा, मका, भुईमूग, कांदा आदी पिके पेरलेली होती. तेव्हा पिकांची स्थिती चांगली होती.

पिके चांगल्या प्रमाणात होतील, अशी अपेक्षा होती. पिके पेरण्यासाठी शेतकऱ्यांनी कर्ज घेऊन, उसनवारी करून कृषी केंद्रांवरून बियाणे, खते घेऊन पेरणी केली. मात्र, फेब्रुवारीत अचानक वादळवारा, पाऊस, गारपीट झाली आणि शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला. झालेल्या नुकसानाची राज्य सरकारने दखल घेत पंचनामे करण्याचे आदेश दिले होते.

राज्य सरकारने मदतही घोषित केली होती. मात्र, ती मदत अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली नाही. तसेच सोनाळा, बावणबीर या परिसरात संत्रा उत्पादक जास्त प्रमाणात आहेत. या परिसरातील शेतकऱ्यांनी अंबिया बहारचा फळ पीकविमा काढला होता.

त्या विम्याचा लाभ अजूनही शेतकऱ्यांना मिळाला नाही. शेतकऱ्यांच्या या मागण्यांची दखल घेत तातडीने मदत मिळवून द्यावी, अशी मागणी वळसे पाटील यांच्याकडे करण्यात आली. या वेळी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Women Farmer Training: पवारवाडीत महिलांना शेतीविषयक धडे

Farmers Protest: ऊस बिलासाठी म्हेत्रेंच्या घरासमोर बेमुदत उपोषण सुरू

Ahilyanagar Zilla Parishad: अहिल्यानगरला ३८ महिलांना मिळणार जिल्हा परिषदेत संधी

Solapur Zilla Parishad: विजय डोंगरे, उमेश पाटलांना संधी, साठेंची अडचण वाढली

Crop Protection: कीड-रोगावर नियंत्रणासाठी पीक निरीक्षणाची गरज 

SCROLL FOR NEXT