Potato Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Potato Production: पहिल्याच प्रयत्नात बटाट्याचे ४२ टन विक्रमी उत्पादन

Potato Farming: वालचंदनगर, जि. पुणे- इंदापूर तालुक्यातील कळंब येथील प्रगतिशील शेतकरी सोमनाथ महादेव पवार यांनी बटाट्याचे पहिल्यांदाच यशस्वी उत्पादन घेतले आहे.

Team Agrowon

Pune News: वालचंदनगर, जि. पुणे- इंदापूर तालुक्यातील कळंब येथील प्रगतिशील शेतकरी सोमनाथ महादेव पवार यांनी बटाट्याचे पहिल्यांदाच यशस्वी उत्पादन घेतले आहे. त्यांची २२ एकर शेती आहे. यातील साडेतीन एकरांवर द्राक्षे, सहा एकरांवर ऊस, अडीच एकरांवर खरबूज व इतर क्षेत्रामध्ये गहु व मका पिके घेतली जातात. त्यांनी पहिल्यांदाच चार एकरांवर बटाटा लागवडीचा प्रयोग यशस्वी केला आहे.

त्यातून एकरी दीड लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न घेतले आहे. यासाठी त्यांनी यांत्रिक पद्धतीने बटाटा पिकाची लागवड २८ ऑक्टोबर, २०२४ मध्ये केली. बटाटा पेरणी, खत, मातीची भर लावणे ही कामे यांत्रिक पद्धतीमुळे एकाचवेळी झाली. पीक चांगले पोसल्यामुळे २०० ग्रॅम ते ५०० ग्रॅम वजनांपर्यंत बटाटे मिळाले.

काढणीसाठी यांत्रिक पद्धतीचा उपयोग केला. योग्य नियोजनामुळे चार एकरांमध्ये ४२ टन उत्पादन मिळाले. १९ रूपयांपासून ते २२, २५ रुपये प्रति किलो दराने त्याची विक्री झाली. सुमारे साडेतीन तीन महिन्यांमध्ये खर्च वजा जाता एकरी दीड लाख रुपयांंच्या आसपास उत्पन्न मिळाले. पवार सातत्याने शेतीत नवनवीन पिके घेण्याचा प्रयोग करीत असतात. त्यांनी मागील वर्षी एक एकरात आल्याचे उल्लेखनीय उत्पादन घेतले होते. त्यास १०० रुपये प्रति किलो दर मिळाला होता.

परिसरातील नागरिकांना बटाटे वडे

सोमनाथ पवार यांनी पहिल्यांदा बटाटा पिकाची लागवड केल्यामुळे नागरिकांना बटाटा पिकाविषयी उत्सुकता होती. पवार यांनी परिसरातील नागरिकांसाठी एक दिवस बटाटे वडे मोफत खाण्यासाठी दिले. सुमारे ४०० नागरिकांनी बटाटेवडे खाण्याचा आस्वाद घेतला. रुपये प्रतिकिलो दर मिळाला होता.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Fire: शामगावात १०८ गुंठ्यांतील ऊस आगीमध्ये जळून खाक

Rural Water Supply Plan: गावे, वाड्या-वस्त्यांना उन्हाळा होणार सुसह्य

India Export: जागतिक व्यापार संघटनेमुळे निर्यातीला चालना

Potato Farming Losses: खर्च ५८ हजार अन् उत्पन्न अवघे २७ हजार

River Conservation: नदीचे आक्रंदन जाणणाऱ्या शैलजा

SCROLL FOR NEXT