Devendra Fadnavis Press Conference Agrowon
ॲग्रो विशेष

Devendra Fadnavis : मला सरकारमधून मोकळे करा

Devendra Fadnavis Press Conference : कितीही आकडेमोड केली तरी आम्हाला अपयश आले आहे हे स्पष्ट आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत पुन्हा भरारी घ्यायची असेल, तर मला सरकारमधून मोकळे करून संघटनेत काम करू द्यावे,

Team Agrowon

Mumbai News : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला जास्त जागा मिळाल्या असल्या, तरी भाजपला मिळालेल्या मतांची टक्केवारी चांगली आहे. कितीही आकडेमोड केली तरी आम्हाला अपयश आले आहे हे स्पष्ट आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत पुन्हा भरारी घ्यायची असेल, तर मला सरकारमधून मोकळे करून संघटनेत काम करू द्यावे, अशी विनंती केंद्रीय नेतृत्वाकडे करणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी (ता. ५) पत्रकार परिषदेत सांगितले.

भाजपच्या प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी पराभवाची मीमांसा करत पक्ष संघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त केली. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने ३० जागांवर मजल मारत महायुतीला १७ जागांवर रोखले. तसेच २३ जागांवरून भाजपला ९ जागांवरच समाधान मानावे लागले.

वेगाने झालेल्या पिछेहाटीनंतर बुधवारी दुपारी १२ वाजता निवडणूक समितीची बैठक झाली. तब्बल तीन तास चाललेल्या या बैठकीत पराभवावर चर्चा केली. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, राधाकृष्ण विखे-पाटील, गिरीश महाजन, अशोक चव्हाण, चंद्रकांत पाटील यांच्यासह अन्य नेते उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, की पंडित नेहरू यांच्यानंतर १९६२ नंतर प्रथमच तिसऱ्यांदा पंतप्रधान बनण्यासाठी जनतेते मोदींना कौल दिला आहे. देशात जितक्या जागा ‘इंडिया’ आघाडीला मिळाल्या आहेत त्यापेक्षा जास्त जागा भाजपला मिळाल्या आहेत.

शेतकरी, मराठा आरक्षण

प्रश्‍नांचा फटका : फडणवीस
शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांकडे दुर्लक्ष करणे भाजपला भोवल्याचेही फडणवीस यांनी मान्य केले. तसेच मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळेही काही जागांवर पराभव पत्करावा लागल्याचे फडणवीस म्हणाले.

जुमलेबाजांना जनतेने  धडा शिकवला : वडेट्टीवार

राहुल गांधी यांनी अथक परिश्रम घेऊन भारत जोडो यात्रा काढली. या यात्रेच्या करिष्म्यामुळे अभूतपूर्व यश मिळाले. भटकती आत्मा म्हणणाऱ्यांना आदरणीय पवार साहेबांनी ‘बाप बाप होता है’ हे दाखवून दिले. ज्यांनी सन्माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या सेनेला नकली सेना म्हणून हिणवले त्यांना देखील जनतेने धडा शिकवला. महाविकास आघाडीच्या सामूहिक प्रयत्नांचे हे मोठे यश असून, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पवित्र भूमीत जनतेने जुमलेबाजांना गाडले आहे, अशी टीका विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. मुंबई येथील प्रचितगड या शासकीय निवासस्थानी बुधवारी वडेट्टीवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bhaskar Jadhav In Assembly: शेतकरी आत्महत्या, कृषी योजना आणि खोट्या आश्वासनांवरून जाधवांनी सरकारला धरले धारेवर

Group Farming : गटशेती हा शाश्‍वत शेतीचा प्रभावी पर्याय ठरू शकतो

Parbhani Rainfall : जून महिन्यात सरासरीहून कमी पाऊस

Farmer Aid Cancellation: नैसर्गिक आपत्तीच्या मदतीत कपात, शेतकऱ्यांची फसवणूक; वड्डेटीवारांचा सरकारवर निशाणा

Raj-Udhhav Unity : ठाकरे बंधूंची एकजूट पालिकेतही दिसावी

SCROLL FOR NEXT