Stock Market Agrowon
ॲग्रो विशेष

Stock Market : शेवगाव तालुक्यात शेअर बाजाराचा विळखा

Share Market Fraud : शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास अधिक रक्कम मिळण्याच्या आशेने नगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक झाली आहे.

सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagar News : शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास अधिक रक्कम मिळण्याच्या आशेने नगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. त्यासाठी गावगावांत एजंट कार्यरत असून अलिकडच्या महिनाभरात गुंतवणूक करून घणारे एजंटच पसार झाल्याने फरार झाल्याने कोट्यवधी रुपयांचा लोकांना गंडा बसल्याची शक्यता आहे.

त्यात शेतकऱ्यांची संख्या अधिक असल्याचे बोलले जात आहे. फसवणूक झाल्याबाबत तक्रार आलेली नाही, फसवणूक झाली असेल तर तक्रार करावी असे पोलिस विभागाने सांगितले आहे.

शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगली रक्कम मिळते या आशेने शेवगाव तालुक्यात साधारण दोन वर्षांपूर्वी काही गावांत एजंटच्या माध्यमातून शेअर बाजारात गुंतवणूक सुरू झाली. काही कालावधीनंतर ६ टक्क्यांपासून २२ टक्क्यापर्यंत म्हणजे दुप्पट रक्कम मिळू लागली. त्यातून एजंटगिरी करणारे अलिशान राहणे, आणि ज्यांनी सुरुवातीला गुंतवणूक करून पैसे परत मिळाल्याने गुंतवणूक करणाऱ्यांत वाढ झाली.

शेतकरी, कामगार, महिला, बचतगटांतील सदस्य, नोकरदार अशा विविध क्षेत्रातील लोकांनी यात गुंतवणूक केली. मिळालेल्या माहितीनुसार एकट्या शेवगाव तालुक्यात ११५ च्या जवळपास एजंट असून वीस हजारांपेक्षा अधिक लोकांनी चार ते पाच हजार कोटींची गुंतवणूक केल्याचा अंदाज आहे.

यात ग्रामीण भागातील शेतकरी संख्या अधिक असल्याचे बोलले जात आहे. रक्कम गुंतवणूक केल्याच्या कच्च्या पावत्या दिलेल्या आहेत. शेअर बाजारात एजंट म्हणून काम करणाऱ्यांनी कोट्यवधी रुपयांची मालमत्ता खरेदी केली असल्याचे लोकांचे म्हणणे आहे.

अलिकडच्या महिनाभरात गुंतवणूक कालावधी संपल्यावर लोकांचे पैसे देण्याच्या काळात काही एजंट गायब झाले आहेत. परदेशातही पैसे गेल्याचे सांगितले जात आहे. शेवगाव तालुक्यातून असे सात ते आठ एजंट सध्या गायब झाल्याचे सांगितले जात आहे. शेवगाव तालुक्यात शेअर बाजाराचा विळखा बसला असून एजंट गायब होत असल्याने मोठा आर्थिक फटका बसला आहे.

मात्र पोलिसांकडे याबाबत तक्रारी नसल्याने किती लोकांची फसवणूक झाली, किती रुपयांचा फटका बसला याबाबत मात्र अधिकृत माहिती मिळत नाही. मात्र काही एजंट गायब झाल्याने शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

कार्यालयाची झाली तोडफोड

शेअर बाजारात ज्याच्याकडे गुंतवणूक केली तो एजंट गायब झाल्याने दोन दिवसांत आंतरवली, लाड जळगाव येथे एजंटच्या कार्यालयाची तोडफोड झाल्याचा प्रकार घडला आहे. खानापूर, घोटनच्या दरम्यान अंतरवाली येथील एका शेअर ट्रेडर व्यावसायिक कोट्यवधी रुपये घेऊन पसार झाला.

परंतु त्याचा साथीदार गावात असल्याने पैसे मिळतील. या आशेवर गुंतवणूकदार शांत राहिले. परंतु रविवार (ता.१४) च्या रात्री त्याने धूम ठोकली. त्यामुळे संतप्त झालेल्या गुंतवणूकदारांनी त्याच्या कार्यालयाची तोडफोड केली. शेअर मार्केटच्या गुंतवणुकीत फसवणूक झालेली आहे. अशी तक्रार घेऊन कोणी आलेले नाही. ज्याची फसवणूक झाली ते आमच्यापर्यंत आल्यानंतर पुढील कारवाई होईल असे पोलिस सांगत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon Rain: तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज; राज्याच्या बहुतांशी भागात पावसाची उघडीप राहण्याची शक्यता

Drip Irrigation: सूक्ष्म सिंचनच्या प्रस्तावांना पूर्वसंमतीची प्रतीक्षा

Solar Energy: वार्षिक दहा लाख युनिट वीजनिर्मितीचा सौर ऊर्जा प्रकल्प

Farmers Market: खानदेशात शेतकरी बाजार केव्हा सुरू होणार

Ancient Farming: शेतीच्या उगमाच्या सिद्धांताला ९२०० वर्षांपूर्वीच्या गुहांचे आव्हान

SCROLL FOR NEXT