Milk Subsidy Agrowon
ॲग्रो विशेष

Milk Subsidy Scheme : प्रोत्साहनपर दूध अनुदान योजनेत चार संस्था सहभागी

Subsidy Update : राज्यातील सहकारी दूध संघ व खासगी दूध प्रकल्प यांना दूधपुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना गायीच्या दुधासाठी प्रतिलिटर ५ रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे.

Team Agrowon

Parbhani News : राज्यातील सहकारी दूध संघ व खासगी दूध प्रकल्प यांना दूधपुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना गायीच्या दुधासाठी प्रतिलिटर ५ रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे. या अंतर्गत परभणी व हिंगोली जिल्ह्यातील ४ खासगी दूध संस्था (प्रकल्प) या योजनेत सहभागी झाल्याची माहिती दुग्धव्यवसाय विकास विभागाच्या सूत्रांनी दिली.

परभणी येथील शासकीय दुग्धशाळेत परभणी व हिंगोली जिल्ह्यातील दूध उत्पादक पुरवठा सहकारी संस्थांकडून दूध संकलन केले जात होते. परंतु दर्जेदार दुधाला देण्यात येणारे कमी दर, दूध उत्पादक, सहकारी दूध उत्पादक संस्था, वाहतूकदारांची देयके वेळेवर अदा न करणे आदी कारणांनी दूध संकलनात घट सुरू झाली.

त्यात पशुखाद्याचे दर वाढत आहेत. दर परवडत नसल्यामुळे दूध उत्पादकांच्या अडचणी वाढल्या. अनेक जण खाजगी डेअरीकडे वळले. त्यामुळे ऑगस्ट २०२२ मध्ये शासकीय दूध खरेदी बंद झाली आहे. आता या दोन जिल्ह्यांतील दूध उत्पादक शेतकऱ्यांना खासगी दूध संकलन संस्थांकडे दुधाची विक्री करावी लागत आहे.

परभणी जिल्ह्यात परभणी, मानवत, पाथरी, गंगाखेड, ताडकळस (ता. पूर्णा) येथे खासगी संस्थांमार्फत दूध खरेदी केली जाते. सध्या प्रतिदिन २२ ते २३ हजार लिटर दूध संकलन होत आहे. हिंगोली जिल्ह्यात हिंगोली, वारंगा (ता. कमळनुरी), वसमत, मार्डी (ता. औंढा नागनाथ) येथे खासगी संस्थांकडून दूध खरेदी केली जाते. प्रतिदिन ३० ते ३५ हजार लिटर दूध संकलन आहे.

गायीच्या दुधासाठी प्रतिलिटर ५ रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याबाबत कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मस्त्य व्यवसाय विकास विभागातर्फे जुलैमध्ये शासन निर्णय काढला आहे. याअंतर्गत अनुदानासाठी परभणी जिल्ह्यातील ३ व हिंगोली जिल्ह्यातील १ खासगी दूध संकलन संस्था सहभागी झाली आहे. या योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांकडील दुधाळ जनावरांची नोंदणी (ईअर टॅग) भारत पशुधन पोर्टलवर असणे बंधनकारक आहे. शेतकऱ्यांचे आधार लिंक बँक खात्याची व दुधाळ पशुधनाची भारत पशुधन पोर्टलवर नोंदणी करण्याचे निर्देश आहेत

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT