Milk Adulteration Committee : दूध भेसळ रोखणाऱ्या समितीची १५ संकलन केंद्रांवर कारवाई

Action on Milk Collection Centres : दूध भेसळ प्रतिबंधक समितीने सलग तीन दिवस केलेल्या नगर जिल्ह्यातील चार तालुक्यांत अकरा दूध संकलन केंद्रांवर कारवाई केली आहे.
Action on Milk Collection Centres
Action on Milk Collection Centres Agrowon
Published on
Updated on

Nagar News : दूध भेसळ प्रतिबंधक समितीने सलग तीन दिवस केलेल्या नगर जिल्ह्यातील चार तालुक्यांत अकरा दूध संकलन केंद्रांवर कारवाई केली आहे. दुधात भेसळ होत असल्याच्या माहितीवरून टाकलेल्या धाडीत चार दूध संकलन केंद्रातून सुमारे चार लाख १४ हजार रुपये किमतीचे १३ हजार ८०० लिटर दूध नष्ट केले आहे. नष्ट केलेल्या दुधासह १० दूध संकलन केंद्रांतून दुधाचे नमुने तपासणीसाठी घेतले आहे.

दूध भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने कारवाई करणे गरजेचे आहे. मात्र संबंधित विभागाने कधीच त्याबाबत खमकी भूमिका घेतली नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी नगर जिल्ह्यात दूध भेसळ रोखण्यासाठी अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांच्या अध्यक्षतेखाली दूध भेसळ प्रतिबंधक समिती केलेली आहे.

Action on Milk Collection Centres
Milk Adulteration : नगरच्या राहुरी, कोपरगाव आणि कर्जतमधील ११ दूध संकलन केंद्रावर भेसळीप्रकरणी कारवाई

समितीने पहिल्यांदाच नगर जिल्ह्यात मोठी कारवाई केली आहे. दूध भेसळ होत असल्याच्या माहितीनंतर समितीने संशयित अकरा केंद्रांवर अचानक धाड टाकली. त्यात कर्जत तालुक्यातील कृष्णाई दूध शीतकरण केंद्रावर नमुना तपासणीला घेऊन ३३ हजार रुपये किमतीचे १२०० लिटर दूध नष्ट केले. मिरजगाव येथील गजानन महाराज मिल्क व प्रोडक्टस येथे १ लाख ३६ हजार रुपये किमतीचे ४२०० लिटर, तर अॅग्रो मिल्क प्रोडक्टस संकलन केंद्रावर १ लाख ३८ हजार रुपये किमतीचे ४६०० दूध नष्ट केले.

Action on Milk Collection Centres
Milk Adulteration : आष्टी तालुक्यात दूध भेसळीचा काळा धंदा उघड

जामखेड तालुक्यातील खर्डा येथील भगवान कृपा दूध संकलन केंद्रात १ लाख १४ हजार रुपये किमतीचे ३८०० लिटर, असे एकूण ४ लाख १४ हजार रुपये किमतीचे १३ हजार ८०० लिटर दूध नष्ट केले आहे. याशिवाय राहुरी तालुक्यातील जगदंबा व जगदंबा माता दूध शीतकरण केंद्र (शिलेगाव), कोपरगाव तालुक्यातील साईअमृत (कोपरगाव), नारायण गिरी (धोंडेवाडी), शिंदे गोठा (जवळके), कर्जत तालुक्यातील साईबाबा व अन्वेषा (दुरगाव), त्रिमूर्ती (कुळधरण), सदगुरू (कर्जत), नागरबाई यादव (बहिरोबावाडी) आदी ठिकाणचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत.

भेसळखोरांची गय नाही

दुधातील भेसळ रोखण्यासाठी कोपरगाव, कर्जत, जामखेड, राहुरी तालुक्यांत कारवाई केली. त्यात अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी यांच्यासह तहसीलदार गुरू बिराजदार, तीन नायब तहसीलदार, सात तलाठी, सात मंडळ अधिकारी, अव्वल कारकून, पोलिस कर्मचारी होते. जिल्ह्यात पहिल्यांदाच एवढी मोठी कारवाई केली. दूध भेसळ रोखण्यासाठी काम सुरूच राहणार असून भेसळखोरांची गय नाही असे समितीने सांगितले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com