Urea Agrowon
ॲग्रो विशेष

Urea Fertilizer : जुन्नर तालुक्यात चारशे टन युरिया उपलब्ध

Fertilizer Demand : तालुक्यात १३ जून अखेर १,८५९ टन युरियाचा पुरवठा झाला होता. तालुक्यातील खरिपाचे क्षेत्र व झालेल्या पर्जन्यमानाचा विचार करता शेतकऱ्यांकडून युरियाची मागणी वाढली होती.

Team Agrowon

Pune News : जुन्नर तालुक्यात चारशे टन युरिया खताचा साठा (ता. २६) अखेर उपलब्ध असून, युरियाची कृत्रिम टंचाई व शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या विक्रेत्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पंचायत समितीचे कृषी अधिकारी तथा गुणनियंत्रण निरीक्षक नीलेश बुधवंत यांनी दिला आहे.

तालुक्यात १३ जून अखेर १,८५९ टन युरियाचा पुरवठा झाला होता. तालुक्यातील खरिपाचे क्षेत्र व झालेल्या पर्जन्यमानाचा विचार करता शेतकऱ्यांकडून युरियाची मागणी वाढली होती. यामुळे कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद पुणे यांच्या कार्यालयाकडे युरिया खताची मागणी कळविण्यात आली होती.

त्यानुसार बुधवार (ता.२६) अखेर तालुक्यात इफ्को कंपनीचा ३२० व पी.पी.एल. कंपनीचा ८६ टन युरिया खताचा पुरवठा झाला आहे. आरसीएफ कंपनीकडून १०० टन युरिया खताचे नियोजन केलेले आहे.

खत विक्रेत्यांनी कृत्रिम टंचाई करू नये. युरिया उपलब्ध असताना शेतकऱ्यांना नाही असे सांगू नये तसेच जादा दराने विक्री करू नये. युरिया सोबत इतर खतांची सक्ती करू नये.

विक्रेता युरियाची जादा दराने विक्री किंवा इतर खतांची सक्ती करत असल्यास शेतकरी बांधवांनी पंचायत समिती कृषी विभाग तसेच कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन बुधवंत यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing Planning: दारव्हा तालुक्यात ६९ हजार हेक्टरवर खरिपाचे नियोजन

Illegal HTBT Cotton Seeds: वर्ध्यात एचटीबीटी कापूस बियाण्यांचा साठा जप्त

El Nino Preparedness Guidance: ‘एल निनो’वर मात करण्यासाठी समन्वयाची गरज : प्रा. डॉ. इंद्र मणी

Agriculture Inputs Shortage: कृषी निविष्ठा विक्रेत्यांकडून युरिया, डीएपीची कृत्रिम टंचाई

BBF Planter: वेळ, मजुरी आणि खर्चात बचत करणारे बीबीएफ पेरणी यंत्र

SCROLL FOR NEXT