Water Issue Agrowon
ॲग्रो विशेष

Waiting for Water : कळंबीतील चारशे एकर क्षेत्र पाण्याच्या प्रतीक्षेत

Water Demand : तलावात टेंभूचे पाणी सोडून पिकांचे होणारे नुकसान टाळावे, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

Team Agrowon

Sangli News : कळंबी (ता. खानापूर) येथील पाझर तलावाखाली असणारे चारशे एकर क्षेत्र पाण्याच्या प्रतीक्षेत असून पाण्याअभावी बागायत पिके वाळू लागली आहेत. तलावात टेंभूचे पाणी सोडून पिकांचे होणारे नुकसान टाळावे, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

कळंबी गावापासून पूर्वेला तीन किलोमीटरवर पाझर तलाव आहे. सध्या हा तलाव कोरडा पडला आहे. तलाव परिसरात सुमारे चारशे एकर बागायत क्षेत्र आहे. उसासह अन्य भाजीपाला शेतकरी पिकवत आहेत. सध्या पिके वाळू लागली आहेत.

तलावात पाइपलाइनद्वारे टेंभूचे पाणी सोडले जात होते. आता ती पाइपालाइन पुढील शिवारात गेल्याने व तलावाच्या बाजूने घसरण असल्याने पाणी तलावात न जाता थेट पुढे जात आहे. कळंबी तलावात पाणी जाण्यासाठी पाइपालाइनला स्टॉपर व वेगळी दारे बसविणे गरजेचे असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

त्यासाठी शेतकऱ्यांनी टेंभूच्या ओगलेवाडी (कऱ्हाड) व कडेपूर येथील कार्यालयात अधिकाऱ्यांची भेट घेऊन पाणी सोडण्याची मागणी केली. सध्या टेंभूचे आवर्तन बंद आहे, पाणी सोडण्याचे अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले आहे. पाण्यासाठी शेतकऱ्यांचा पाठपुरावा सुरू आहे. मात्र कधी पाणी सोडणार, असा सवाल शेतकरी करत आहेत.

टेंभूची नेवरी वितरिका खानापुरातील ढवळेश्वरपर्यंत आली आहे. तेथून कळंबीपर्यंत वितरिकेचे काम झाल्यास ढवळेश्वरचा उत्तर भाग व कळंबीच्या दक्षिण भागातील पाचशे हेक्टरला फायदा होऊ शकतो.

सध्या पाझर तलाव कोरडा पडला आहे. शेतीची अवस्था बिकट झाली आहे. तलावात पाणी सोडण्यासाठी टेंभूच्या अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा सुरू आहे. पिण्याच्या पाण्यासाठी लोकांना पायपीट करावी लागत आहे. टेंभूचे पाणी तातडीने सोडून शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकालात काढावा, अन्यथा आम्ही शेतकरी उपोषणास बसणार आहोत.
हणमंत कदम, शेतकरी, कळंबी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nanded Crop Insurance : नांदेडमधील पीकविमा परतावा वितरणासाठी मुहूर्त ठरेणा

Fish Farming : कृषी विभागातर्फे शेती, मत्स्यपालनाचे धडे

Paddy Plantation : पावसामुळे मुरूड तालुक्यातील भात लावणीचे काम पूर्ण

Crop Insurance Scheme : सांगली जिल्ह्यात ८१ हजार शेतकऱ्यांनी घेतला पीकविमा

Banana Crop Insurance : केळीविमाधारकांच्या परताव्यांना विलंब शक्य

SCROLL FOR NEXT