Kolhapur Kalammawadi Dam agrowon
ॲग्रो विशेष

Kalammawadi Dam : काळम्मावाडी धरणातील यंदाच्या पाणी साठ्याचे सूत्र ठरलं, पाणी गळती तशीच

Water Resources Department : गळती समस्येमुळे सलग तिसऱ्या वर्षी धरणात क्षमतेपेक्षा कमी साठा राहणार आहे.

sandeep Shirguppe

Kolhapur Rain : कोल्हापूर जिल्ह्याची वरदायीनी असलेल्या काळम्मावाडी धरणाला मागच्या ३ वर्षांपासून गळती लागली आहे. काळम्मावाडी धरणाच्या गळतीवरून मोठ्या प्रमाणात राजकारण झालं परंतु गळती काही निघाली नाही, अखेर जलसंपदा विभागाला काळम्मावाडी धरणातील यंदाच्या पाणी साठ्याचे सूत्र सापडले.

यंदा धरणात २२ टीएमसी म्हणजे ६४३ मीटर पाणीपातळीपर्यंत पाणीसाठा ठेवण्यात येणार आहे. गळती समस्येमुळे सलग तिसऱ्या वर्षी धरणात क्षमतेपेक्षा कमी साठा राहणार आहे.

काळम्मावाडी धरणाचे उपअभियंता प्रशांत कांबळे यांच्या माहितीनुसार, यंदा धरणात २२ टीएमसी पाणीसाठा ठेवण्याचे निर्देश मिळाले आहेत. यानुसार तितकाच पाणीसाठा ठेवण्यात येईल. साठ्यापेक्षा अधिक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मागील वर्षी धरणात २४.५० टीएमसी पाणीसाठा ठेवला. तरीही पावसाळ्यापूर्वी धरणात तीन टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहिला. वर्षभर पुरेल इतका पाणीसाठा धरणात राहणार आहे.

२०२२ मध्ये तज्ज्ञ समितीच्या निर्देशानुसार, सांडवापातळीपर्यंत म्हणजे २० टीएमसी इतकाच पाणीसाठा ठेवला होता. मागील वर्षी धरण पाणीसाठ्यात ४.५० टीएमसीने वाढ करून तो २४.५० ठेवणला. यंदा मागील वर्षापेक्षा पाणीसाठा अडीच टीएमसीने घटवण्यात येणार आहे,

आधी सलग दोन वर्षे क्षमतेपेक्षा कमी साठा ठेवल्याने यंदा धरणात किती पाणीसाठा ठेवायचा याचा प्रस्ताव जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंत्यांकडे पाठविला होता. त्यांच्या अभिप्रायानुसार धरणातील यंदाच्या पाण्यासाठी निश्चिती झाली आहे.

यंदाचा पाणीसाठा धरणाच्या पूर्ण क्षमतेपेक्षा साडेतीन टीएमसीने कमी राहणार आहे. धरणाची पूर्ण संचय क्षमता २५.४० टीएमसी इतकी आहे. लाभ क्षेत्रात शेती व पिण्यासाठी होणाऱ्या पाणी वापराच्या अभ्यासाअंती धरणातील यंदाच्या पाणीसाठा वर्षभर पुरेल इतका राहणार आहे.

आगामी काळात गळती प्रतिबंधक उपाययोजना झाल्यानंतरच धरणात पूर्ण क्षमतेने पाणीसाठा करणे सुरू होईल, हे स्पष्ट झाले आहे. सध्या धरणात २२ टीएमसीपेक्षा अधिक पाणीसाठा झाला आहे. निश्चित केलेल्या पाणीसाठापेक्षा अतिरिक्त पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Unseasonal Rain Crop Damage: अवकाळी, गारपिटीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरु, शेतकऱ्यांना मदत मिळणार, कृषिमंत्र्यांची विधानसभेत माहिती

Women Empowerment: महिला बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ देण्यासाठी प्रयत्नशील

Farmer Protest: आंबा, काजू बागायतदारांनी मुंबई-गोवा महामार्ग रोखला

PAN Card Rules: पॅन कार्ड प्रक्रियेत मोठे बदल; १ एप्रिलपासून नवे नियम लागू, जाणून घ्या माहिती

Sugarcane FRP: सांगलीतील १० कारखान्यांकडे २८० कोटी एफआरपी थकीत

SCROLL FOR NEXT