Nano Fertilizer : केंद्र सरकारचा नॅनो युरिया, डीएपी निर्मितीला बूस्‍टर

Nano Urea : केंद्र सरकारने नॅनो युरियाला प्रोत्साहन देण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. केंद्राने देशभरात नॅनो युरियाच्या सहा, तर नॅनो डीएपीच्या चार प्रकल्पांची उभारणी करण्यात आली आहे.
Nano Urea Plus
Nano Urea PlusAgrowon
Published on
Updated on

Kolhapur News : केंद्र सरकारने नॅनो युरियाला प्रोत्साहन देण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. केंद्राने देशभरात नॅनो युरियाच्या सहा, तर नॅनो डीएपीच्या चार प्रकल्पांची उभारणी करण्यात आली आहे. या प्रकल्‍पांतून वार्षिक २६.६२ कोटी (पाचशे मिलि) बाटल्या तयार करण्यात येणार आहेत. तर नॅनो डीएपीच्या १०.७४ कोटी बाटल्यांचे (पाचशे आणि हजार मिली) उत्पादन करण्यात येणार आहे.

या प्रकल्पांसाठी खत विभागाने नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड आणि राष्ट्रीय केमिकल्स अॅण्ड फर्टिलायझर्स लिमिटेड या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम कंपन्यांना नॅनो युरिया प्लांट्स उभारण्यासाठी प्रोत्साहित केले आहे.

गेल्या काही वर्षांपासून केंद्र सरकारने नॅनो युरिया व डीएपीच्या वापरांसाठी अधिकाअधिक प्रयत्न सुरू केले आहेत. रसायन आणि खते मंत्रालयाच्या मार्फत नॅनो युरियाच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी शिबिरे, वेबिनार, पथनाट्य, प्रात्यक्षिके, शेतकरी संमेलने आणि प्रादेशिक भाषांमधील माहितीपट इत्यादी यासारखे विविध उपक्रम आयोजित केले जात आहेत.

Nano Urea Plus
Nano DAP : नॅनो डीएपी, ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर

पारंपरिक खतांचा वापर करून नॅनो युरिया खतांचा वापर करण्यासाठी केंद्राने शक्य तितके प्रयत्न करत आहे. या मध्ये १५,००० महिला बचत गटांना ड्रोन पुरवण्याच्या उद्देशाने, ‘नमो ड्रोन दीदी’ योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत, खत कंपन्यांनी महिला बचत गटांच्या नमो ड्रोन दीदींना १०९४ ड्रोन उपलब्ध करून दिले आहेत.

यामुळे ड्रोनद्वारे नॅनो खतांचा वाढीव वापर सुनिश्चित केला जात आहे. खते विभागाने खत कंपन्यांच्या सहकार्याने सल्लामसलत आणि क्षेत्रीय प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून देशातील सर्व १५ कृषी हवामान विभागांमध्ये नॅनो डीएपीचा अवलंब करण्यासाठी महाअभियान सुरू केले आहे.

२०२१ मध्ये राष्ट्रीय कृषी संशोधन प्रणालीच्या अंतर्गत २० आयसीएआर, देशातील कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्रांमध्ये ४३ पिकांवर चाचणी करण्यात आली. यानंतर संपूर्ण भारतातील पिकांवरील परिणामकारकता तपासण्यासाठी ९४ पिकांवर चाचणी करण्यात आली.

Nano Urea Plus
Nano Urea Plus : कृषी मंत्रालयाने आणले शेतकऱ्यांसाठी नॅनो युरियाचे नवे व्हर्जन

नॅनो युरियाच्या वापरामुळे पिकांच्या ८ टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. यामुळे केंद्राने याला प्रोत्साहन देण्याचे काम सुरू ठेवले आहे. नॅनो युरियाची निर्मिती आत्मनिर्भर भारत, आत्मनिर्भर शेती या अंतर्गत करण्यात आली आहे. नॅनो युरिया पिकांवर प्रभावी ठरला आहे. नॅनो युरिया जमिनीतील पाण्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी देखील फायदा होत आहे.

ग्लोबल वॉर्मिंग कमी करण्यासाठी नॅनो युरिया प्रभावी ठरत आहे. शेतकऱ्यांनी नॅनो युरियाचा वापर केल्यास मातीची गुणवत्ता वाढण्यास देखील मदत होणार आहे. नॅनो युरियामुळे पिकांची गुणवत्ता वाढवण्यास देखील मदत असल्याने उत्पादन वाढविण्यासाठी हे प्रकल्‍प महत्त्वाचे ठरतील, असे मत खत मंत्रालयांच्‍या सूत्रांनी व्यक्त केले.

येथून पुढील काळात पारंपरिक खतांवरचे अवलंबित्व कमी करण्यासाठी केंद्राच्या वतीने सर्व ते प्रयत्न करण्यात येत आहेत. या अंतर्गतच या प्रकल्‍पांची उभारणी होत आहे.
- अनुप्रिया पटेल, केंद्रीय रसायने आणि खते राज्यमंत्री

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com