Raju Shetti On Soybean and Maize prices Agrowon
ॲग्रो विशेष

Raju Shetti : ...तर त्रिदेव असलेल्या सरकारला घरी बसण्याची वेळ येईल; सोयाबीन आणि मक्याच्या भावावरून राजू शेट्टी यांचा सरकारला इशारा

Raju Shetti On Soybean and Maize prices : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी राज्यातील महायुती सरकारला शेतीप्रश्नावरून घेरणे सुरू केले आहे. याआधी शेट्टी यांनी सरकारवर कृषी पुरस्कारांच्या निधीच्या कारणावरून टीका केली होती.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर निशाना साधत टीका केली आहे. यावेळी शेट्टी यांनी शेतकऱ्यांच्या सोयाबीन आणि मक्याच्या भावावरून महायुतीसह मोदी सरकारवर निशाना साधला. जसे लोकसभा निवडणुकीवेळी कांद्यांच्या प्रश्नावरून शेतकऱ्यांनी सरकारला वठणीवर आणलं. तसचं विधानसभेच्या निवडणुकीत सोयाबीन आणि मक्यावरून होईल, असा इशारा शेट्टी यांनी समाजमाध्यमातून पोस्ट करत शनिवारी (ता.२४) दिला आहे.

यावेळी शेट्टी यांनी आपण मागच्या एक महिन्याभरापासून शेतकरी आंदोलनानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रासह मध्यप्रदेशमधील काही भागांचा दौरा केल्याचे म्हटले आहे. तर सोयाबीन व मका पिकाचे यंदा चांगले उत्पादन आले असून शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. परंतु केंद्र सरकारने पामतेल व मका आयात करायचा निर्णय घेतल्यामुळे सोयाबीन व मक्याचे दर कमी होत असल्याचा दावा शेट्टी यांनी केली आहे.

केंद्राच्या आडमुठ्या धोरणाचा सोयाबीन व मका उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसणार असून तातडीने केंद्र सरकारने याबाबत उपाययोजना करावी असा इशारा शेट्टी यांनी दिला आहे. तसेच केंद्र सरकारने आपल्या धोरणात बदल न केल्यास शेतकऱ्यांचं सोन असलेल्या सोयाबीनचा भाव २ हजार ५०० ते ३ हजार रूपये होईल. ज्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची माती होईल अशी शक्यता शेट्टी यांनी व्यक्त केली आहे.

शेट्टी यांनी यावेळी केंद्रासह राज्य सरकारला लोकसभा निवडणुकितील कमी झालेल्या जागांची आठवण करून देताना, कांद्यामुळे लोकसभा निवडणुकीत मोदी सरकारला शेतकऱ्यांनी वठणीवर आणलं होतं. आता सोयाबीन आणि मक्याचा भाव पडल्यास आगामी विधानसभा निवडणुकीत त्रिदेव असलेल्या सरकारला घरी बसण्याची वेळ येईल, असा इशारा शेट्टी यांनी राज्य सरकारसह केंद्र सरकारला दिला आहे.

याआधी देखील शेट्टी यांनी कृषी विभागाकडून देण्यात येणाऱ्या शेतकऱ्यांच्या विविध पुरस्कारावरून राज्य सरकारवर निशाना साधला होता. तसेच सरकारकडे जर शेतकऱ्यांना पुरस्कार देण्यासाठी निधी नसेल तर आमदारांचे एका महिन्याचे वेतन थांबवा असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी म्हटले होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT