Agriculture Award : तिजोरीत शेतकऱ्यांच्या पुरस्कारासाठी पैसै नसतील तर आमदारांचे वेतन थांबवा; शेट्टी यांचा सरकारवर निशाना

Raju Shetti On Agriculture Award : कृषी विभागाच्या फाईलवर नियोजन विभागाने निधी नसल्याच्या शेऱ्यावरून सरकारवर आता टीका होत आहे.
Raju Shetti On Agriculture Award
Raju Shetti On Agriculture Award
Published on
Updated on

Pune News : कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांसाठी निधी नसल्याचा शेरा नियोजन विभागाने कृषी विभागाच्या फाईलवर दोन दिवसांपूर्वी मारला होता. यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी सरकारला धारेवर धरत समाजमाध्यमावर टीका केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये पुरस्काराच्या निधीवरून चर्चा रंगली आहे.

राज्य सरकारच्या वतीने देण्यात येणाऱ्या विविध कृषी पुरस्कारांच्या रक्कमेसाठी राज्य सरकारकडे सध्या निधी नसल्याचा शेरा नियोजन विभागाने दोन दिवसांपूर्वी मारला होता. तसेच शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांसाठी राज्य सरकारच्या तिजोरीत पैसे नसल्याचे म्हटले होते. त्यावरून शेट्टी यांनी सरकारवर निशाना साधला आहे. शेट्टी यांनी, राज्याच्या तिजोरीत शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या पुरस्कारासाठी पैसै नसतील तर ही योग्य बाब नसल्याचे म्हटले आहे. तसेच शेतकऱ्यांच्या पुरस्कारासाठी राज्य सरकारने २८८ आमदारांचे १ महिन्याचे वेतन थांबवावे आणि शेतकऱ्यांना त्यांचे पुरस्कार तातडीने देण्यात यावेत अशी मागणी केली आहे.

Raju Shetti On Agriculture Award
Agriculture Award : शेतकऱ्यांच्या पुरस्कारासाठी सरकारकडे नाहीत पैसे

कोण कोणते पुरस्कार?

राज्य सरकारकडून प्रतिवर्षी डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न, वसंतराव नाईक कृषिभूषण, जिजामाता कृषिभूषण, कृषिभूषण पुरस्कार, वसंतराव नाईक शेतीमित्र, युवा शेतकरी, उद्यान पंडित, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी (सर्वसाधारण गट), वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी (आदिवासी), पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न आणि उत्कृष्ट कृषी शास्त्रज्ञ पुरस्कार असे २०९ पुरस्कार देण्यात येतात.

पुरस्कार रखडण्याची शक्यता?

मात्र दरवर्षी देण्यात येणारे पुरस्कार गेल्या दोन वर्षांपासून देण्यात आलेले नाहीत. कृषी विभागाने गेल्या दोन वर्षांतील पुरस्कार जाहीर केले असून फक्त निधी नसल्याने त्यांचे वाटप केलेले नाही. यावेळी आता नियोजन विभागाने राज्याच्या तिजोरीत पैसेच नसल्याचा शेरा मारला आहे. त्यामुळे यंदाही राज्यातील शेतकऱ्यांचे पुरस्कार रखडण्याची शक्यता आहे.

Raju Shetti On Agriculture Award
Raju Shetti : हमीभाव, कर्जमुक्तीसाठी निर्णायक आंदोलन करणार

अजित पवार यांचीच घोषणा

दरम्यान २०२१ मध्ये नाशिक येथील पुरस्कार वितरण सोहळ्यात तत्कालीन आणि सध्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुरस्काराच्या रक्कमेक तिप्पट वाढ करण्याची घोषणा केली होती. मात्र गेल्या दोन वर्षापासून पुरस्कारांचे वाटप झालेले नाही.

पुरस्काराची रक्कम

राज्याच्या कृषी विभागाकडून कृषिरत्न पुरस्कारासाठी ७५ हजार, कृषिभूषणसाठी प्रत्येकी ५० हजार, शेतीमित्र आणि युवा शेतकरी पुरस्कारासाठी प्रत्येकी ३० हजार, शेतीनिष्ठ पुरस्कारासाठी प्रत्येकी ११ हजार असे बक्षीस देण्यात येते. तर यंदापासून या पुरस्काराच्या रक्कमेक तिप्पट वाढ करण्यात आली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com