Chhatrapati Sambhaji Raje Agrowon
ॲग्रो विशेष

Chhatrapati Sambhaji Raje : सरकारचे पैसे मिळाले नाही तर मी स्वतः मदत करणार, नुकसानग्रस्तांना छत्रपती संभाजीराजेंचे आश्वासन

Aslam Abdul Shanedivan

Pune News : मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यात मागील आठवड्यात पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. हदगाव तालुक्यातही अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त भागाचा दौरा स्वराज्य पक्षाचे प्रमुख माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी सोमवारी (ता.९) केला. यावेळी त्यांनी सरकारचे पैसे मिळाले नाही तरी आपण मदत करू, असे आश्वासन दिले.

नांदेडच्या हदगाव तालुक्यातील उंचाडा गावात छत्रपती संभाजीराजे यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी, मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हाता तोंडाला आलेली पीके पाण्यामध्ये अक्षरशः वाहून गेली आहेत. येथील भयावह परिस्थिती असून शेतकऱ्यांचं दुःख पाहणे सहन होतं नाही. तर ते व्यक्त करायला देखील शब्द नसल्याचे छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटले आहे.

सरकारने पंचनामे केले पाहिजेत, पैसे दिले पाहिजे यात दुमत नाही. पण ज्या शेतकऱ्यांनी पीकविमा काढला आहे. त्यांचे पैसे केंव्हा देणार? असा सवाल देखील छत्रपती संभाजीराजे यांनी केला आहे. तर शासनाने वेळेवर मदत नाही केल्यास स्वराज्य संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांना मदत करू, असे देखील त्यांनी आश्वासन शेतकऱ्यांसह नुकसानग्रस्तांना दिले आहे.

यावेळी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर निशाना साधताना, शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून तो संकटात सापडला आहे. अशावेळी कृषिमंत्र्यांनी इकडे यायचे सोडून सांस्कृतिक कामात व्यस्त असणे बरोबर नाही. कृषिमंत्र्यांना शोभत का हे? या इकडं बघा इथली परिस्थिती असाही टोलाही छत्रपती संभाजीराजे यांनी लगावला आहे.

घरांची पडझड झाली त्यांना सरकार, फक्त दहा-पाच हजाराची मदत केली की काम झालं असं होत नाही. ज्यांच्या घरांची पडझड झाली त्यांना घरकुल मिळाली पाहिजे. आम्ही शेताच्या बांधावर आणि शेतात जाऊन पाहणी करत आहोत. इतरही लोकप्रतिनिधीनी यायला पाहिजे. तसेच कृषिमंत्र्यांनीही इथं येऊन इथल्या समस्या जाणून घेतल्या पाहिजेत, असेही छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटले आहे.

यावेळी छत्रपती संभाजीराजे यांनी उपस्थित महसूल अधिकाऱ्यांना त्वरित पंचनामे करण्याचे सूचना करताना मदतही लवकर द्या असे म्हटले आहे. यावेळी स्वराज्य पक्षाचे उपाध्यक्ष माधवराव पाटील देवसरकर, सरचिटणीस धनंजय जाधव, उपाध्यक्ष अंकुश कदम, सदा पुयड, मंगेश कदम, गजानन सोळंके, तिरुपती भगनुरे, बालाजी कराळे, अवधूत पवार, पवन मोरे, अमोल मारलेगावकर मुन्ना शिंदे, कृष्णा हडपकर, अवधूत वानखेडे, आकाश गोडले, निरंजन कदम, शिवा शिंदे, राहुल लांडगे यांच्यासह कार्यकर्ते व शेतकरी बांधव उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Modi In Wardha : मोदींच्या हस्ते अमरावतीतील टेक्स्टटाईल पार्कचं भूमिपूजन; कापूस उत्पादकांना होणार फायदा?

Cotton Bollworm : गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी कीटक मिलन व्यत्यय तंत्रज्ञान

Sericulture : रेशीम शेतीसाठी तुतीच्या सुधारित जाती

Vegetables Market : कोल्हापूर बाजारात टोमॅटो दरात वाढ; कोथिंबीरचे अचानक दर घसरले, कांद्याची आवक वाढली

Water Conservation : जलसंधारणासह जयपूरची पर्यावरणात आघाडी

SCROLL FOR NEXT