agrowon
ॲग्रो विशेष

Chairman Rajaram Sugar Factory : राजाराम कारखान्याच्या माजी अध्यक्षांना मारहाण, वर्चस्ववादातून दोन गटांत हाणामारी

Kolhapur Crime News : कोल्हापूर जिल्ह्यातील भेंडवडे येथे वर्चस्ववादातून दोन गटांत झालेल्या तुंबळ हाणामारीत दोन्ही गटांतील पाच ते सहा जण जखमी झाले.

sandeep Shirguppe

Kolhapur Beaten Case : भेंडवडे (ता. हातकणंगले) येथे वर्चस्ववादातून दोन गटांत झालेल्या तुंबळ हाणामारीत दोन्ही गटांतील पाच ते सहा जण जखमी झाले, ही घटना काल (ता. ०५) सकाळी घडली, दरम्यान, दोन दिवसांपूर्वी सायंकाळी विजय जालिंदर कुंभार (वय २६) याला मारहाण केल्याप्रकरणी पेठवडगाव पोलीस ठाण्यात सहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

यामध्ये अभिजित सर्जेराव माने, संग्राम बाळासाहेब माने, बाळासाहेब दिनकर माने, सुशांत संजय पाटील, रोहन किरण कांबळे, करण माने (सर्व रा. माळवाडी,भेंडवडे) यांचा समावेश आहे.

दरम्यान, या घटनेचे पडसाद काल सकाळी उमटले, दोन्ही गट आमने सामने आल्याने काठ्या व शस्त्रांचा वापर झाल्याने अनेक जण जखमी झाले आहेत. एक मोटारसायकल पेटविली असून दुसऱ्या गाडीवर दगड टाकून मोडतोड केली आहे.

गावात तणावपूर्ण वातावरण असून मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जयसिंगपूर विभागाच्या पोलीस उपअधीक्षक रोहिणी साळुंके यांनी घटनास्थळी भेट देऊन दोन्ही गटांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, ग्रामपंचायतीच्या निवडणुकीपासून दीड वर्षे झाले येथील सर्जेराव माने व अमोल निकम गटात वर्चस्ववादातून धुसफूस सुरू होती. त्यांचे पडसाद उमटून काल रात्री निकम गटाच्या एकास मारहाण झाली.

तर काल (०५) झालेल्या मारहाणीत निकम गटाच्या बालाजी निकम व संतोष निकम यांच्यावर शस्त्राने हल्ला झाला, तसेच माने गटाच्या छत्रपती राजाराम साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष सर्जेराव माने व अन्य दोघांना मारहाण झाली. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अधिक तपास पोलीस निरीक्षक भैरव तळेकर करत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

E-Peek Pahani: शेतकऱ्यांचं टेन्शन मिटलं! ई- पीक पाहणी प्रक्रियेत मोठा बदल, सहायकांची नियुक्ती, शासन निर्णय जारी

Farmer Fraud: शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करा

Pikvima Scam: पीकविमा अर्जासाठी सीएससी चालकांकडून शेतकऱ्यांची लूट

Dairy Farming: नवतंत्रज्ञानातून दुग्ध उत्पादनात वाढ शक्य

Pik Vima Dharashiv: गतवर्षीच्या खरिपातील पीकविम्याचा मार्ग मोकळा

SCROLL FOR NEXT