Pankaja Munde Agrowon
ॲग्रो विशेष

Pankaja Munde : पंकजा मुंडे यांना मोठा धक्का! वैद्यनाथ साखर कारखान्याला नोटिस

vaidyanath cooperative sugar factory : भाजप नेत्या माजी मंत्री पांकजा मुंडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. तसेच त्यांना धक्का देणारा मोठा निर्णय समोर आला आहे. थकीत कर्जाच्या वसुलीसाठी वैद्यनाथ कारखान्यावरच कुऱ्हाड कोसळली आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : भाजप नेत्या माजी मंत्री पंकजा मुंडे या परळी वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावरून अडचणीत आल्या आहेत. त्या अध्यक्ष असणाऱ्या या कारखान्यावर कारवाईची कुऱ्हाड कोसळली आहे. तर २०३ कोटी ६९ लाख रुपये थकीत कर्जाच्या वसुलीसाठी या कारखान्याचा लिलावात काढला जाणार आहे. याबाबत युनियन बँक ऑफ इंडियाने तारीख ठरवली असून २५ जानेवारी रोजी ई लिवाव पद्धतीने कारखान्याचा लिलाव करण्यात येणार आहे. यामुळे मुंडे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

पंकजा मुंडे अध्यक्ष असणाऱ्या वैद्यनाथ कारखान्याला काहीच दिवसांपूर्वी जीएसटी विभागाने नोटीस बजावली होती. तसेच १९ कोटी रूपये थकीत असल्याने ती नोटीस बजावली होती. मात्र ती भरण्यास मुंडे यांनी यासाठी नकार दिला होता. त्यापाठोपाठ आता कर्ज थकीत प्रकरणास मुंडे यांना सामोरे जावं लागत आहे.

२०३ कोटी ६९ लाख रुपयांचे कर्ज

परळी वैद्यनाथ सहकारी कारखान्याने युनियन बँक ऑफ इंडियाकडून तब्बल २०३ कोटी ६९ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. दरम्यानच्या काळात कर्जावरून बँकेकडून नोटिसा बाजवण्यात आल्या होत्या. मात्र यावरून उत्तर न मिळाल्याने २०३ कोटी ६९ लाख रुपयांच्या वसूलासाठी अश्रुबा काळे, भाऊसाहेब घोडके, भीमराव तांबडे, दत्तात्रय देशमुख, श्रीनिवास दीक्षितुल्लू यांना बँकेने लिलाव नोटीस बजावली आहे.

छत्रपती संभाजीनगर येथील युनियन बैंक ऑफ इंडियाच्या उस्मानपुरा शाखेकडून कर्ज, व्याज व इतर कर्जाच्या वसुलीसाठी ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. तर या प्रकरणी २५ जानेवारी रोजी ई लिवाव हा होणार आहे. सकाळी ११ ते ५ वाजेपर्यंत हा लिवाव होणार आहे.

गोपिनाथ मुंडे यांनी केली पायाभरणी

युनियन बँक ऑफ इंडिया कारखान्यावर तब्बल २०३ कोटी ६९ लाख रुपयांचे कर्ज आहे. तर हा कारखाना लोकनेते गोपिनाथ मुंडे यांनी उभारला आहे. तर त्यांच्या पश्चात त्यांचा प्राण म्हणजे ही कारखाना असल्याची भावना मुंडे समर्थकांची आहे.

मुंडे अडचणीत सापडल्या

लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी मारठवड्यातील शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी वैद्यनाथ सहकारी कारखाना उभारला होता. ज्याचा आता लिलावात निघणार आहे. याच कारखान्यात गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक उभारण्यात आले आहे. त्यामुळे पंकजा मुंडे या अडचणीत सापडल्या आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Illegal Sand Mining: बाणगंगे नदीतून अवैध वाळू उपसा

Agricultural College Camp: दर्जी बोरगावमध्ये कृषी महाविद्यालयाचे शिबीर

Wildlife Conflict: शेतांत हत्तींचा कळप ठाण मांडून

Ujani Dam Hunger Strike: उजनी धरण कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे बेमुदत उपोषण

Silk Village Project: लातूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात एक रेशीमयुक्त गाव निर्माण करणार

SCROLL FOR NEXT