Sahyadri Farms
Sahyadri Farms  Agrowon
ॲग्रो विशेष

Sahyadri Farms : सह्याद्री फार्म्स’मध्ये ३१० कोटींची थेट परकीय गुंतवणूक

Team Agrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
नाशिक : सह्याद्री शेतकरी उत्पादक कंपनीची (Sahyadri Farmer Producer Company) १०० टक्के मालकी असलेल्या ‘सह्याद्री फार्म पोस्ट हार्वेस्ट केअर लि.’ (Sahyadri Farms Post Harvest Care ltd.) या कंपनीमध्ये युरोपातील गुंतवणूकदारांच्या समूहाने ३१० कोटींची थेट परकीय गुंतवणूक केली आहे. इंकोफिन, कोरीस, एफएमओ आणि प्रोपार्को या गुंतवणूकदारांचा त्यामध्ये समावेश आहे. व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून फायदेशीर आणि शाश्वत स्वरुपात चालविण्याच्या सह्याद्रीच्या भूमिकेवर या गुंतवणुकीमुळे शिक्कामोर्तब झाले आहे.  

छोट्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना साह्य प्रदान करणारे मॉडेल विकसित केले आहे. सुरुवातीला २०१० मध्ये दहा शेतकऱ्यांच्या छोट्या गटाने एकत्र येत युरोपात द्राक्षनिर्यात केली. त्याचा विस्तार होत सह्याद्री फार्म्सच्या रूपाने देशातील आघाडीची फळे व भाजीपाला निर्यात आणि प्रक्रिया करणारी कंपनी बनली आहे. सध्या ९ पिके, १८ हजार शेतकरी आणि ३१ हजार एकरांहून अधिक क्षेत्रावर विस्तार झाला आहे.
गुंतवणूकदारांकडून सह्याद्री फार्म्समध्ये झालेली भांडवली गुंतवणूक शेतकरी कंपनीची आणखी वाढ करण्याच्या उद्देशाने करण्यात आली आहे. त्यातून प्रक्रिया, फळे आणि भाजीपाला उत्पादन क्षमता वाढ, तसेच प्रक्रिया पश्‍चात कचऱ्यापासून वीजनिर्मितीसाठी बायोमास प्लांट आणि पॅकहाउससारख्या पायाभूत सुविधांचा विस्तार करण्यासाठी या गुंतवणुकीचा उपयोग केला जाणार आहे. गुंतवणूक प्रक्रियेत ‘अल्पेन कॅपिटल’ने सह्याद्री फार्म्ससाठी विशेष धोरणात्मक सल्लागार म्हणून काम केले.

प्रतिक्रिया
शेतकऱ्यांना संघटित करून उद्योजकांप्रमाणे व्यावसायिकदृष्ट्या विचार करून कामकाज करणे ही सह्याद्रीची मूळ संकल्पना आहे. शेती हा फायदेशीर आणि व्यावहारिक व्यवसाय बनावा या उद्देशाने एक शाश्‍वत, मोठ्या प्रमाणात वाढ होण्यासाठी सक्षम अशी संस्था विकसित करीत आहोत.
-विलास शिंदे, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक-सह्याद्री फार्म्स
-----
भागीदारी आधारित दृष्टिकोनातून विकसित झालेल्या सह्याद्री फार्म्सच्या संकल्पनेचा कृषी क्षेत्रात वैश्‍विक रोल मॉडेल म्हणून प्रसार व्हावा. ज्यातून शाश्‍वत आर्थिक परिणाम, हवामान बदलासाठी अनुकूल आणि ग्रामीण समुदायात सर्वसमावेशक विकास साध्य करताना शेती क्षेत्र तंत्रज्ञान आधारित आणि जागतिक स्पर्धाक्षम व्यवसाय होईल.
- राहुल राय, पार्टनर-इंकोफिन इंडिया

भारतातील शेतकऱ्यांचे नेतृत्व करणाऱ्या एका संस्थेमध्ये झालेली ही पहिली आंतरराष्ट्रीय भांडवली गुंतवणूक आहे. सह्याद्री फार्म्सला आणखी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यास आणि कृषी उद्योगाच्या पुढील वाढीसाठी ‘ब्लू प्रिंट’ तयार करण्यात नक्कीच उपयुक्त ठरेल. छोट्या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी सह्याद्री फार्म्सच्या रूपाने दीर्घकालीन भागीदार मिळाल्याबद्दल खूप आनंद  झाला  आहे.
- मायकेल जोन्गेनील, मुख्य कार्यकारी अधिकारी, एफएमओ

भारतीय शेतकरी उत्पादक कंपनीत या गुंतवणुकीमुळे अनेक सकारात्मक सामाजिक आणि पर्यावरणपूरक परिणाम होणार आहेत. सुरुवातीला जवळपास १५ हजार शेतकरी आधुनिक पुरवठा साखळीत प्रवेश करून सक्षम होतील. शेतकऱ्यांना उत्पादने  आणि त्यांची गुणवत्ता वाढ शक्य येईल. शिवाय ऊर्जा उत्पादनातील हिस्सा ५० टक्क्यांहून अधिक वाढवून शेवटी शून्य कचरा धोरणाची अंमलबजावणीही शक्य होईल. 
- फ्रँकोइस लोम्बार्ड, मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रोपार्को

सह्याद्रीची वाटचाल शेतकरी ते उद्योजक अशी एका प्रेरक आहे अत्याधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करून पारंपरिक भारतीय शेतीचे रूपांतर करण्याचा दृष्टिकोन अंगीकारला आहे. कृषी मूल्यसाखळीत पारदर्शकता आणण्यात आणि मुख्यत्वे शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखालील शेतकऱ्यांची कंपनी म्हणून विकसित करण्यासाठी वचनबद्ध आहे.
- हरी सुब्रमण्यम, पार्टनर-कोरीस, इंडिया

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT