Amit Tupe Agrowon
ॲग्रो विशेष

Turmeric Production : हळदीच्या अधिक उत्पादनासाठी दर्जेदार बेणे हवे

Agrowon Sanvad : : हळदीच्या उत्पादकता वाढीसाठी योग्य जमिनीची निवड, माती परिक्षण, दर्जेदार बेणे, बेणे प्रक्रिया करुन लागवड, काटेकोर पाणी, खत, तण, कीड-रोग व्यवस्थापन या बाबी अत्यंत महत्त्वाच्या आहेत.

Team Agrowon

Parbhani News : हळदीच्या उत्पादकता वाढीसाठी योग्य जमिनीची निवड, माती परिक्षण, दर्जेदार बेणे, बेणे प्रक्रिया करुन लागवड, काटेकोर पाणी, खत, तण, कीड-रोग व्यवस्थापन या बाबी अत्यंत महत्त्वाच्या आहेत, असे प्रतिपादन परभणी येथील कृषी विज्ञान केंद्रातील विषय विशेषज्ञ (उद्यानविद्या) अमित तुपे यांनी केले.

‘सकाळ-ॲग्रोवन’ व‌ रिवुलिस इरिगेशन इंडिया प्रा. लि. यांच्यातर्फे बुधवारी (ता. २२) रात्री फुलकळस (ता. पूर्णा, जि. परभणी) येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर येथे आयोजित ‘ॲग्रोवन संवाद’ चर्चासत्रात ‘हळद लागवड व व्यवस्थापन’ या विषयावर ते बोलत होते.

विजय गव्हाळे अध्यक्षस्थानी होते. रिवुलिस इरिगेशन इंडिया प्रा. लि. वरिष्ठ कृषी सल्लागार शिवराज लोणाळे, विभागीय व्यवस्थापक‌ विजय घुगे, पूर्णाचे तालुका कृषी अधिकारी संतोष भालेराव, सकाळाचे सहायक व्यवस्थापक (वितरण) अनंता रेनगडे, ताडकळस येथील रिवुलिस इरिगेशन इं. प्रा. लि.चे अधिकृत विक्रेते श्रीगणेश अॅग्रो एजन्सीचे गणेश शिराळे, विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन दिगंबर शिराळे, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष विलास शिराळे,

अॅग्रोवनचे वितरण प्रतिनिधी सुरेश पाचकोर, ताडकळस येथील सकाळचे बातमीदार शिवाजी शिराळे, सकाळ अॅग्रोवनचे वितरक रवी एडके आदी उपस्थित होते. तुपे म्हणाले, की हळदीसाठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी, भुसभुशीत जमीन निवडावी. चुनखडीचे प्रमाण अधिक असलेल्या जमिनीत लागवड करू नये.

खतांच्या संतुलित मात्रा देण्यासाठी माती परीक्षण करावे. कुरकुमीनचे प्रमाण अधिक असलेल्या वाणाच्या दर्जेदार बेण्याची प्रक्रिया करून लागवड केल्यास कीड, रोगाचा प्रादुर्भाव कमी करता येतो. ठिबकद्वारे विद्राव्य खते, सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या मात्रा द्याव्यात. कंद माशीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी हळद पिकांमध्ये माती लावावी.

हळदीमध्ये झेंडूचे आंतरपीक तर सापळा पीक म्हणून एरंडीची लागवड करता येते. हळद काढणीनंतर शिजविणे, वाळविणे, पॉलिशिंग या प्रक्रिया वेळेत पूर्ण कराव्यात. लोणावळे म्हणाले, की हळदीच्या उत्पादन वाढीसह पाण्याचा अधिक कार्यक्षम वापरासाठी आधुनिक ठिबक सिंचन संचाचा वापर करावा.

भालेराव म्हणाले, की हळदीच्या मुल्यवर्धनासाठी शेतकऱ्यांनी गट, कंपन्यांच्या माध्यमातून एकत्र येऊन प्रक्रिया उद्योग सुरू करावेत. कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घ्यावा. प्रास्ताविक अॅग्रोवनचे जिल्हा बातमीदार माणिक रासवे यांनी केले. सूत्रसंचालन करून आभार प्रगतिशील शेतकरी साधुजी मिसाळ यांनी मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

Crop Insurance Scheme: नांदेडमध्ये पीकविमा योजनेत ९ लाखांहून अधिक अर्ज

Irrigation Projects : रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना गती

Farm Loan Waiver: कर्जमाफी रक्कम वितरणास विलंब का? सहकारमंत्र्यांनी सांगितलं कारण

Mechanized Paddy Transplantation: यंत्राने भात लागवडीकडे वाढता कल

SCROLL FOR NEXT